Pegasus Spyware Dainik Gomantak
ग्लोबल

पेगासस स्पायवेअर बनविणाऱ्या कंपनीच्या अध्यक्षांनी दिला राजीनामा

पेगासस स्पायवेअर विकसित करणारी सायबर सुरक्षा कंपनी NSO चे अध्यक्ष आशर लेव्ही यांनी राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

पेगासस स्पायवेअर विकसित करणारी सायबर सुरक्षा कंपनी NSO चे अध्यक्ष आशर लेव्ही (Asher Levy) यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, पेगासस हेरगिरीवरुन इस्रायल आणि जगातील इतर देशांमध्ये निर्माण झालेला गोंधळ हे आपल्या राजीनाम्याचे कारण असल्याचे मानण्यास त्यांनी मात्र नकार दिला. लेवी म्हणाले, 'कंपनीतून बाहेर पडण्याच्या काही महिने आधीच मी नियोजन केले होते. माझ्या राजीनाम्याचा अलीकडच्या गदारोळाशी काहीही संबंध नाही. (Asher Levy Chairman Of NSO A Cybersecurity Company That Develops Pegasus Spyware Has Resigned)

इस्रायलच्या हेरगिरी प्रकरणाची संसदीय चौकशीची मागणी

या महिन्यात, इस्रायलमधील (Israel) खासदारांनी नागरिकांवर स्पायवेअरचा वापर झाल्याचे सांगत संसदीय चौकशीची मागणी केली आहे. हिब्रू भाषेतील वृत्तपत्र कॅल्कलिस्टच्या अहवालानुसार, 2020 मध्ये, तत्कालीन पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधातील निदर्शनांमध्ये सहभागी राजकारणी आणि सामान्य नागरिकांची हेरगिरी करण्यासाठी पोलिसांनी NSO ने तयार केलेल्या स्पायवेअर पेगाससचा (Pegasus Spyware) वापर केला.

दोन महिन्यांपूर्वी, यूएस टेक कंपनी असलेल्या ऍपलने पेगासस बनवणाऱ्या एनएसओ ग्रुपवर गुन्हा दाखल केला होता. एनएसओ ग्रुपने पेगाससच्या माध्यमातून आयफोन युजर्सची हेरगिरी केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. एनएसओवर बंदी घालण्याची मागणीही कंपनीने केली आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणाची भारतात (India) चौकशी सुरु आहे. यासह, आमच्या वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा पूर्णपणे सुरक्षित असेल. कंपनीने पुढे सांगितले की, पेगाससने 1.65 अब्ज वापरकर्त्यांची हेरगिरी केली आहे, ज्यात एक अब्जाहून अधिक आयफोन वापरकर्ते आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT