जगातील भ्रष्ट देशांची रॅकिंग जाहीर, भारताची एका क्रमांकाने सुधाराणा, तर...

'ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल' (Transparency International) या जगप्रसिद्ध संस्थेने मंगळवारी 'करप्शन परसेप्शन इंडेक्स' (CPI) जाहीर केला आहे. या निर्देशांकात जगातील 180 देशांचा समावेश करण्यात आला आहे.
Imran Khan & Narendra Modi
Imran Khan & Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

'ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल' (Transparency International) या जगप्रसिद्ध संस्थेने मंगळवारी 'करप्शन परसेप्शन इंडेक्स' (CPI) जाहीर केला आहे. या निर्देशांकात जगातील 180 देशांचा समावेश करण्यात आला आहे. या देशांतील भ्रष्टाचाराच्या पातळीच्या आधारे त्यांची क्रमवारी ठरते. CPI निर्देशांकानुसार, भारताने (India) एक रँकिंगचा फायदा झाला आहे. अशा प्रकारे तो 180 देशांपैकी 85 व्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानची (Paksitan) परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्याची कामगिरी सुधारण्याऐवजी खराब झाली आहे. या यादीत पाकिस्तान 124 वरुन 140 व्या स्थानावर गेला आहे. (India Has Improved By One Point In The Corruption Perception Index)

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यासाठी हा एका मोठ्या झटक्यापेक्षा कमी नाही, कारण त्यांनी सत्तेत येण्यापूर्वी आपले सरकार भ्रष्टाचारमुक्त देश बनवण्याचे आश्वासन दिले होते. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने म्हटले आहे की, 2021 च्या जागतिक 'भ्रष्टाचार धारणा निर्देशांक' मध्ये पाकिस्तान 16 स्थानांनी घसरला आहे. तसेच 180 देशांपैकी 140 क्रमांकावर आहे. जागतिक भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बर्लिनस्थित या संस्थेने जारी केलेल्या अहवालात जगभरातील भ्रष्टाचाराची पातळी स्थिर असल्याचे म्हटले आहे. 86 टक्के देशांनी गेल्या 10 वर्षात फारशी प्रगती केलेली नाही.

पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशचा स्कोअर किती होता

2021 च्या आवृत्तीत, 'करप्शन परसेप्शन इंडेक्स' (CPI) सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या त्यांच्या कथित स्तरांवर आधारित शून्य (अत्यंत भ्रष्ट) ते 100 (अत्यंत स्वच्छ) या स्केलवर 180 देश आणि प्रदेशांची क्रमवारी लावते. 2020 मध्ये, CPI मध्ये पाकिस्तानचे 100 पैकी 31 गुण होते. ते 180 देशांपैकी 124 क्रमांकावर होते. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या मते, देशाचा भ्रष्टाचाराचा स्कोअर आता 28 वर आला आहे, तर निर्देशांकात एकूण 180 देशांपैकी 140 क्रमांकावर आहे. त्या तुलनेत भारताचा स्कोअर 40 असून तो 85 व्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, बांगलादेशचा स्कोअर 26 आहे आणि तो 147 व्या स्थानावर आहे.

कोणते देश यादीत अव्वल आहेत?

यंदाच्या यादीत डेन्मार्कने (Denmark) जगातील सर्वोत्तम कामगिरी केली असून तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर फिनलंड दुसऱ्या क्रमांकावर, न्यूझीलंड तिसऱ्या, नॉर्वे चौथ्या आणि सिंगापूर पाचव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, सर्वात वाईट स्थिती दक्षिण सुदानची असून तो 180 व्या स्थानावर आहे. त्याआधी सीरिया, सोमालिया, व्हेनेझुएला आणि येमेनचा क्रमांक लागतो. अहवालात म्हटले आहे की, भ्रष्टाचारविरोधी प्रयत्न वाढत असून परिस्थिती बिकट होत आहे. तसे पाहता मानवी हक्क आणि लोकशाहीवर हल्ले वाढत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com