Armenia Parliament Fight Video Dainik Gomantak
ग्लोबल

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Armenia Parliament Fight Video: आर्मेनियाच्या संसदेतून एक अतिशय खळबळजनक आणि चक्रावून टाकणारी घटना समोर आली.

Manish Jadhav

Armenia Parliament Fight Video: आर्मेनियाच्या संसदेतून एक अतिशय खळबळजनक आणि चक्रावून टाकणारी घटना समोर आली. गुरुवारी आर्मेनियाची संसद कोणत्याही राजकीय चर्चेचे व्यासपीठ नसून जणू काही कुस्तीचा आखाडाच बनली. संसदेच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये तुफान हाणामारी झाली. या भयानक राड्यात खासदारांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव केला, एकमेकांच्या दिशेने खुर्च्या भिरकावल्या.

हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर संसदेच्या (Parliament) मुख्य सभागृहापासून सुरु झालेली ही मारामारी थेट कॉरिडोअरपर्यंत पोहोचली. तिथेही खासदार एकमेकांना भिडले. सुरक्षारक्षक आणि इतर सदस्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु बराच वेळ कुणीही शांत होण्यास तयार नव्हते.

या संपूर्ण हिंसक वादाची सुरुवात एका वादग्रस्त प्रस्तावावरुन झाली. विरोधी पक्ष असलेल्या 'स्ट्रॉन्ग आर्मेनिया' पार्टीने देशात एक नवीन मंत्रालय स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता, ज्यावर तीव्र राजकीय वाद निर्माण झाला. सत्तारुढ 'सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट' पक्षाचे खासदार तारोन चाखोयान यांनी या प्रस्तावाला विरोध करताना विरोधी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आणि एका नेत्याकडे महिलांसमोर माफी मागण्याची मागणी केली.

या शाब्दिक चकमकीनंतर वाद विकोपाला गेला. चाखोयान यांनी विरोधी नेत्यावर अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर दोन्ही बाजूंचे खासदार भडकले. विरोधक थेट पोडियमच्या दिशेने धावले आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे धक्काबुक्कीचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. या गोंधळादरम्यान खुद्द संसदेचे उपसभापती वाहागन अलेक्सान्यान यांनीही विरोधी खासदारांच्या दिशेने खुर्ची भिरकावली. अनेक खासदारांनी एकमेकांवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या आणि संसदेतील टेबलांची तोडफोड केली.

विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार सुरु असताना संसदेच्या लाईव्ह प्रसारणाचा कॅमेरा सुरुच होता, जेणेकरुन जनतेला संसदेचे खरे रुप पाहता येईल. या राड्यात काही खासदार जखमी झाले असून त्यांच्या उपचारासाठी संसद परिसरात तातडीने रुग्णवाहिका बोलवावी लागली. एका विरोधी खासदाराच्या नाकातून रक्त वाहत होते तर दुसऱ्याचे कपडे फाटले होते. संसदेच्या इतिहासातील ही अत्यंत लज्जास्पद घटना सध्या संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

Indian Super League: 2 बरोबरीनंतर एफसी गोवाला विजयाची आस; इंटर काशीविरुद्ध प्रशिक्षक गौरमांगी सिंग आशावादी

Railway Pass New Rules 2026: रेल्वे कर्मचारी, पेन्शनर्ससाठी खूशखबर! आता पासवर राजधानी, शताब्दी अन् दुरंतोने करता येणार प्रवास; वाचा नवा नियम

Under 23 Cricket: पहिल्या डावात आघाडी, तरीही गोव्याचा पराभव; ओडिशाने 125 धावांनी दिला धक्का

SCROLL FOR NEXT