Argentina Boy Married To Grand Mother Age Aunt Dainik Gomantak
ग्लोबल

...म्हणून 23 वर्षीय तरुणाने 91 वर्षीय चुलतीशी केलं लग्न; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Argentina Boy Married To Grand Mother Age Aunt: एका मुलाने आपल्या 91 वर्षांच्या चुलतीशी लग्न केले.

Manish Jadhav

Argentina Boy Married To Grand Mother Age Aunt: एका मुलाने आपल्याच 91 वर्षांच्या चुलतीशी लग्न केले. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्याने तिच्या पेन्शनवर दावा केला. मात्र, प्रशासनाने त्याचा हा दावा फेटाळून लावला.

आता त्याने आपण पेन्शनसाठी हक्कदार असल्याचे सांगितले आहे. त्याचे लग्न योग्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी तो लढणार आहे. तो पुन्हा अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे मात्र, हे प्रकरण धक्कादायक असले तरी ते खूपच रंजक आहे आणि प्रेमकहाणी देखील खूप रोमँटिक आहे, कारण मुलाचे वय फक्त 23 वर्षे आहे.

शेजाऱ्यांनी हे लग्न खोटे असल्याचे सांगितले

दरम्यान, अर्जेंटिनाच्या (Argentina) वायव्येकडील साल्टा शहरात राहणारा 23 वर्षीय वकील मॉरिसिओ 2009 मध्ये त्याच्या पालकांपासून विभक्त झाला. विभक्त झाल्यानंतर तो त्याची आई, बहीण, आजी आणि 91 वर्षीय चुलतीबरोबर राहू लागला.

फेब्रुवारी 2015 मध्ये, त्याने त्याची चुलती, योलान्डा टॉरिसशी लग्न केले. मात्र, योलान्डाचा एप्रिल 2016 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर मॉरिसिओने योलान्डाच्या पेन्शनवर दावा केला. त्याने अर्जात म्हटले की, तो योलान्डाचा पती असून तो तिच्या पेन्शनचा हक्कदार आहे.

दुसरीकडे मात्र, दाव्यावर सुनावणी करताना, जेव्हा कोर्टाने तपास पूर्ण केला तेव्हा शेजाऱ्यांनी योलान्डासोबतचे त्याचे लग्न खोटे असल्याचे सांगितले आणि योलान्डा ही मॉरिसिओची चुलती असल्याचे सांगितले.

मॉरिसिओने लग्न सिद्ध करण्याचा दावा केला

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मॉरिसिओच्या कुटुंबीयांना ओळखणाऱ्या लोकांचीही चौकशी केली. मॉरिसिओ आणि योलान्डाच्या लग्नाबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.

शेजारी आणि मॉरिसिओच्या कुटुंबीयांकडून अहवाल मिळाल्यानंतर प्रशासनाने मॉरिसिओचा दावा फेटाळून लावला. दावा फेटाळल्यानंतर मॉरिसिओ संतप्त झाला.

त्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना बजावले की, त्याने खरोखरच योलान्डाशी लग्न केले आहे आणि तो ते सिद्ध करेल. योलान्डाचे पेन्शन (Pension) कायद्याने देय असून तो त्यासाठी हक्कदार आहे. त्यासाठी त्याला कोणत्याही न्यायालयात हजर व्हावे लागले तरी चालेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पाकिस्तान झिंदाबाद' फलकप्रकरणी हणजूण पोलिसांची मोठी कारवाई, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; व्हिस्की पीडिया स्टोअरचे मालक अडचणीत!

Goa Crime: 63 वर्षीय भाडेकरुची निर्घृण हत्या, डोंगर कापणीच्या तक्रारीतून अज्ञातांकडून मारहाण; मोरजीतील धक्कादायक घटना

IND vs SA: दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतची धमाकेदार एंट्री; सोपवली उपकर्णधारपदाची जबाबदारी!

''माझी साथ विसरलास का?'', विराटच्या प्रेमात बनवली रील, कोहलीला 'बेवफाह' म्हणणाऱ्या पोस्टवर अनुष्काची लाईक; Video

Video: गोवा किंवा देशात पाकिस्तानच्या समर्थनाथ घोषणाबाजी देण्याचे कोणालाच धाडस नाही, तरुणांनी शांत राहावे; मायकल लोबो

SCROLL FOR NEXT