Baba Vanga
Baba Vanga Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Vanga Prediction: बाबा वेंगा यांच्या भाकिताने पुन्हा वाढवली चिंता, 2023 बाबत धक्कादायक खुलासे!

Manish Jadhav

Baba Vanga Prediction: बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितांबद्दल प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. बाबा वेंगा यांच्या अनुयायांचे म्हणणे आहे की, त्यांनी केलेली बहुतेक भाकिते खरी ठरली आहेत. बाबा वेंगा यांनी 2023 या वर्षाबाबतही अनेक धोकादायक भाकिते केली आहेत.

आता ही भाकिते हळूहळू खरी ठरत असल्याचा विश्वास त्यांच्या अनुयायांना वाटत आहे. असे झाल्यास 2023 मध्ये जगावर मोठे संकट येऊ शकते.

कोणती भाकिते खरी ठरली?

1. बाबा वेंगाच्या अनुयायांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत त्यांची 3 भाकिते खरी ठरली आहेत. यातील पहिले भाकित हे अवकाळी पावसाबाबत होते. एप्रिल महिन्यात उत्तर भारतातील लोक अवकाळी पावसाने चांगलेच सुखावले आहेत.

या पावसाने नागरिकांना (Citizens) उन्हापासून थोडा दिलासा दिला. अवकाळी पावसामुळे पारा कमालीचा घसरला होता. बाबा वेंगा यांचे अनुयायी या अवकाळी पावसाला त्यांच्या भाकिताशी जोडून बघत आहेत.

2. 2023 मध्ये, नासाच्या शास्त्रज्ञांनी सूर्याच्या पृष्ठभागावर अनेक सौर वादळांची नोंद केली. ही वादळे अनेक किलोमीटरपर्यंत मोठी होती, ज्यांच्या ज्वाला दूरवर पसरल्या होत्या.

बाबा वेंगा यांचे अनुयायी या सौर वादळांना त्यांचे भाकीत खरे असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे नुकतेच सूर्यावर एक मोठे छिद्रही सापडले आहे.

3. अलीकडेच, तुर्कस्तानमध्ये प्रचंड विनाशकारी भूकंप झाला. या भूकंपात (Earthquake) हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. बाबा वेंगाच्या अनुयायांचे म्हणणे आहे की, त्यांनी आधीच हे भाकीत केले होते, जे आता खरे ठरले आहे.

बाबा वेंगा कोण आहे?

बाबा वेंगा यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता. अनेकांना वाटते की, बाबा एक पुरुष आहेत, परंतु त्यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा होते, जी एक अंध महिला होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांनी 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याची भविष्यवाणी आधीच केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT