Anand Mahindra Dainik Gomantak
ग्लोबल

आनंद महिंद्रा यांनी कॅनडाला दिला मोठा झटका, 'ही' कंपनी केली बंद!

Mahindra & Mahindra: आता भारत आणि कॅनडा यांच्यात नव्या प्रकारचे युद्ध सुरु झाले आहे. ज्यात आनंद महिंद्रा यांनीही उडी घेतल्याचे दिसत आहे.

Manish Jadhav

Mahindra & Mahindra: भारत आणि कॅनडा यांच्यात नव्या प्रकारचे युद्ध सुरु झाले आहे. ज्यात आनंद महिंद्रा यांनीही उडी घेतल्याचे दिसत आहे. महिंद्रा अँड महिंद्राने कॅनडाला मोठा धक्का दिला असून गुरुवारी आपल्या कंपनीचे कामकाज बंद केले.

गुरुवारी माहिती देताना महिंद्रा अँड महिंद्राने सांगितले की, त्यांची कॅनडास्थित कंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने कामकाज बंद केले आहे.

महिंद्रा अँड महिंद्राकडे कंपनीत 11.18 टक्के हिस्सा आहे, ज्याने ऑपरेशन्स बंद करण्यासाठी अर्ज केला होता. या निर्णयानंतर महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या निवेदनात काय म्हटले आहे हे ते जाणून घेऊया...

M&M चे वक्तव्य

महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 20 सप्टेंबर 2023 रोजी ऑपरेशन्स बंद करण्याच्या मंजुरीसाठी रेसनला कॉर्पोरेशन कॅनडाकडून (Canada) आवश्यक कागदपत्रे मिळाली होती, ज्याची माहिती कंपनीला कळवण्यात आली होती.

यानंतर रेसनने आपले कामकाज बंद केल्याचे कंपनीने म्हटले आहे. 20 सप्टेंबर 2023 पासून ती कंपनीची सहयोगी नाही.

कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

या बातमीनंतर महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये (Shares) मोठी घसरण पाहायला मिळाली. बाजार बंद होण्याच्या 10 मिनिटे आधी महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 3 टक्क्यांच्या घसरणीसह 1584 रुपयांवर व्यवहार करत होते.

मात्र, व्यवहाराच्या सत्रात कंपनीचे शेअर साडेतीन टक्क्यांनी घसरले आणि दिवसभरातील 1575.75 रुपयांच्या खालच्या पातळीवर पोहोचले. तर एक दिवस आधी कंपनीचे शेअर्स 1634.05 रुपयांवर बंद झाले होते.

महिंद्रा अँड महिंद्राचे मोठे नुकसान

दुसरीकडे, कंपनीच्या शेअर्सच्या घसरणीमुळे कंपनीच्या मूल्यांकनात 7200 कोटी रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे. आकडेवारीनुसार, एका दिवसापूर्वी कंपनीचा शेअर 1634.05 रुपये होता आणि कंपनीचे मार्केट कॅप 2,03,025.78 कोटी रुपये होते.

आज जेव्हा कंपनीचे शेअर्स 1575.75 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले, तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 1,95,782.18 कोटी रुपये झाले. अशा स्थितीत कंपनीच्या मूल्यांकनाला 7,243.6 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT