Spanish Village On Sale: परदेशात घर असावे अशी प्रत्येकाची ईच्छा असते. समजा जर तुम्हाला माफक किंमतीत फक्त घरापेक्षा अख्ख गावच विकत घेण्याची संधी मिळाली तर तुम्ही घेणार का? थांबा ही जाहिरात नाही... तर खरोखर स्पेनमधील एक बातमी आहे. जिथं अख्ख गावच विकायला काढलं आहे. बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 30 वर्षांपासून निर्जन असलेले एक स्पॅनिश गाव सध्या 227,000 युरो (2,16,87,831 रुपये) मध्ये विकले जाणार आहे.
साल्टो डी कॅस्ट्रो असे या गावाचे नाव असून, पोर्तुगालच्या सीमेवर झामोरा प्रांतात वसले आहे. स्पेनच्या माद्रिदपासून तीन तासांच्या अंतरावर हे गाव आहे. या गावात 44 घरे, एक हॉटेल, एक चर्च, एक शाळा, एक म्युनिसिपल स्विमिंग पूल आणि अगदी सिव्हिल गार्डसाठी वापरल्या जाणार्या बॅरेक इमारतीचा समावेश आहे, असे बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.
साल्टो डी कॅस्ट्रो गावाला पर्यटन स्थळ बनवण्याच्या उद्देशाने 2000 च्या दशकात एकाने विकत घेतले. युरोझोनच्या संकटामुळे हे पर्यटन स्थळ यशस्वी होऊ शकले नाही. रॉयल इन्व्हेस्ट कंपनीसाठी काम करणाऱ्या रॉनी रॉड्रिग्ज यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, "येथे हॉटेल उभारण्याचे मालकाचे स्वप्न होते पण ते रखडले. तरीही हा प्रकल्प पूर्ण करायला त्यांन आवडेल."
स्पॅनिशमधील हे गाव Idealista, या प्रॉपर्टी रिटेल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आली आहे. "मी ही मालमत्ता विकत आहे. हा भाग शहरी आहे आणि त्याचा वारसा सांभाळू शकत नाही." असे या मालमत्तेच्या मालकाने वेबसाइटवर उल्लेख आहे.
तेव्हा जर तुमचे परदेशात घर घेण्याचे स्वप्न असेल तर, स्पेनमधील या ऑफरचा विचार करायला हरकत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.