Nepal's Foreign Minister Narayan Prakash Saud Dainik Gomantak
ग्लोबल

सांप्रदायिक तणावादरम्यान नेपाळने 1 अब्ज हिंदूंसाठी केली 'ही' मोठी घोषणा, चीनही देणार पाठिंबा

Nepal News: नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या सांप्रदायिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या हितासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Manish Jadhav

Nepal News: नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या सांप्रदायिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या हितासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

नेपाळ सरकारने हिंदूंच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाच्या पाठीशी चीनही उभा आहे. सरकारच्या या घोषणेने जगभरातील हिंदूंमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

नेपाळचे परराष्ट्र मंत्री नारायण प्रकाश सौद यांनी गुरुवारी सांगितले की, 'आमच्या सरकारने या वेळी 1 अब्ज हिंदू यात्रेकरुंना तिबेटमधील कैलास मानसरोवरला जाण्यासाठी सर्वात लहान मार्ग उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने 1 अब्ज हिंदू यात्रेकरुंना मदत करण्याची योजना आखली आहे.'

जगभरातील हिंदूंना या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी मदत करण्याच्या योजनेला चीनही पाठिंबा देत असल्याचे ते म्हणाले. चीनसोबत (China) झालेल्या कराराच्या अंमलबजावणीनंतर ही योजना प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

नेपाळचे परराष्ट्र मंत्री नारायण प्रकाश सौद म्हणाले की, तिबेट स्वायत्त प्रदेशातील नगारी येथे असलेले कैलास मानसरोवर तीर्थक्षेत्र जगभरातील हिंदूंसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते.

तिबेटमधील बौद्ध, जैन आणि स्थानिक बोनपा भक्तांचीही तिबेटमधील (Tibet) या दोन नैसर्गिक पवित्र स्थळांवर प्रचंड श्रद्धा आहे. सौद यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असून जगभरातून मोठ्या संख्येने हिंदू नेपाळमार्गे कैलास मानसरोवरला जाण्यास प्राधान्य देतील.

इतकेच नाही तर ज्या भारतीयांना वेळ वाचवायचा आहे, ते खाजगी ऑपरेटर्सच्या माध्यमातून नेपाळमार्गे कैलास मानसरोवरला जाण्याचा पर्याय निवडतात. यामुळे हा प्रवास नेपाळ सरकारसाठी फायदेशीर ठरत आहे.

नेपाळ कैलास मानसरोवर यात्रेकरुंसाठी मार्ग उपलब्ध करुन देणार

कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर चीनने यावर्षी कैलास मानसरोवर तीर्थक्षेत्र खुले केले होते.

तथापि, फीमध्ये प्रचंड वाढ आणि व्हिसावरील अनेक निर्बंध, विशेषत: भारतीय यात्रेकरुंसाठी, यामुळे यात्रेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

तिबेटच्या अनेक भागांसह आठ दिवसांच्या चीन दौऱ्यावरुन परतलेले सौद ललितपूर जिल्ह्यात म्हणाले की, “कैलास मानसरोवर हे जगभरातील हिंदूंसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. सर्व हिंदूंना तिबेटमध्ये असलेल्या या पवित्र ठिकाणी पोहोचण्याची आणि भेट देण्याची इच्छा आहे.

नेपाळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कैलास मानसरोवरला जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देऊ शकतो.'' ते पुढे म्हणाले की, ''आमच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने यासाठी अभ्यास केला आहे.

नेपाळच्या माध्यमातून कैलास प्रदेशात पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या काही दिवसांत आम्ही चिनी अधिकाऱ्यांशी चर्चा करु. आम्ही यापूर्वीच चीन सरकारला तिन्ही मार्ग खुले करण्याची मागणी केली असून चीन सरकारने याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.''

नेपाळसह भारतीय प्रवाशांच्या सोयीसाठी चीनशी चर्चा केली

कैलास मानसरोवर प्रदेशात जाण्यासाठी नेपाळमधून तीन मार्ग आहेत - हुमला जिल्ह्यातील हिलसा, बझांगची खोरी आणि दार्चुला जिल्ह्यातील टिंकर. हे सर्व मार्ग पश्चिम नेपाळमध्ये आहेत. मानसरोवर सरोवर हे हुमला जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिमीकोटच्या उत्तर-पश्चिमेस सुमारे 160 किलोमीटर अंतरावर आहे. सौद म्हणाले की, “प्रथम नेपाळी आणि भारतीय प्रवासी आणि भाविकांसाठी मानसरोवरचा प्रवास सुलभ करण्यासाठी चिनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांशी करार करणे आवश्यक आहे. यासाठी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांना नियमित संपर्कात राहावे लागणार आहे.''

परराष्ट्र मंत्री सौद पुढे म्हणाले की, 'कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी फक्त तीन प्रवेश बिंदूंऐवजी चीनने नेपाळ आणि चीन दरम्यान 14 प्रवेश बिंदू प्रस्तावित केले आहेत, ज्याचा उद्देश सामान्य प्रवाशांच्या सोयी आणि वाहतूक वाढवणे हा आहे. आम्ही यावर अभ्यास करत आहोत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

IFFI 2025: आयसीएफटी युनेस्को गांधीपदक स्पर्धेतील चित्रपट कोणते? पहा लिस्ट..

Kamini Kaushal: 1948 ते 2022! मनोजकुमारचा शहीद ते आमीरच्या लालसिंग चढ्ढापर्यंत कार्यरत असणारी अभिनेत्री 'कामिनी कौशल'

Umrah Pilgrims Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात! मदिनाजवळ टँकरला धडकून बसला आग, 42 भारतीय यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू

Bihar Election Goa Impact: गोव्याच्या दृष्टीनेही 'बिहार' निकालाचा विचार करणे गरजेचे..

SCROLL FOR NEXT