PM Narendra Modi's Poem google image
ग्लोबल

PM Narendra Modi's Poem: अभी तो सूरज उगा है... मोदींच्या स्वरचित कवितेवर अमेरिकन्स फिदा; 'अशी' आहे पूर्ण कविता...

अमेरिकन संसदेत मोदींच्या भाषणावेळी 15 वेळा स्टँडिंग ओव्हेशन, 79 वेळा टाळ्यांचा कडकडाट

Akshay Nirmale

PM Narendra Modi's speech in US Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकन दौरा सध्या चर्चेत आहेच, पण त्यातही कॅपिटॉल हिल येथे झालेल्या अमेरिकन संसदेतील मोदींच्या भाषणाचे कौतूकही होत आहे.

या संपुर्ण भाषणात मोदींसाठी अनेकदा टाळ्या वाजल्या, तसेच अनेकदा स्टँडिंग ओव्हेशनही मिळाले. दरम्यान, या भाषणात मोदींनी सादर केलेल्या कवितेवरदेखील चर्चा सध्या सुरू झाली आहे.

अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी स्वत: लिहिलेली कविता ऐकवली. त्या कवितेचे शब्द असे होते,

आसमान में सिर उठाकर,

घने बादलों को चीरकर,

रोशनी का संकल्प लें,

अभी तो सूरज उगा है...

दृढ निश्चय के साथ चलकर,

हर मुश्किल को पार कर,

घोर अंधेर को मिटाने,

अभी तो सूरज उगा है...

पंतप्रधान मोदींची ही कविता ऐकताच अमेरिकेच्या संसदेत मोदी-मोदी असा जयघोष झाला. यावेळी संपूर्ण अमेरिकन संसद काही मिनिटांसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला. मोदींनी एकूण 57 मिनिटे भाषण केले.

या भाषणात त्यांना 15 वेळा स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आले, तर पंतप्रधानांसाठी 79 वेळा टाळ्यांचा कडकडाट झाला.

यूएस काँग्रेसचे सदस्य डॅन मुसर म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप छान भाषण केलं. ते उत्साहवर्धक होते. मी खूप प्रभावित झालो. जगासमोरील समस्या आणि संघर्ष याबाबत त्यांचे भाषण अतिशय समर्पक होते. मला वाटते की, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट प्रत्येकजण यातून शिकू शकतो.

दरम्यान, या भाषणानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'अमेरिकन काँग्रेसला संबोधित करणे हा नेहमीच मोठा सन्मान असतो. या सन्मानाबद्दल मी भारतातील 1.4 अब्ज लोकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. तुमच्यापैकी जवळपास निम्मे लोक 2016 मध्ये इथे होते.

भाषणात मोदींनी कोविड, जागतिक व्यवस्था अशा अनेक विषयांना हात घातला होता. आफ्रिकन युनियनला G20 चे पूर्ण सदस्यत्व द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. मोदींनी महात्मा गांधी आणि मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांना श्रद्धांजली वाहिली.

मोदी म्हणाले, स्वातंत्र्य, समानता आणि न्यायासाठी ज्यांनी काम केले त्यांची आठवण आम्ही ठेवतो, असे मोदी म्हणाले. आमच्याकडे बावीस अधिकृत भाषा आणि हजारो बोली आहेत, तरीही आम्ही एक आहोत. भारत सर्व धर्मांचे घर आहे.

2014 मध्ये पंतप्रधान म्हणून त्यांनी पहिल्यांदा अमेरिकेला भेट दिली तेव्हा भारत ही जगातील 10वी मोठी अर्थव्यवस्था होती. आज, भारत ही पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, आणि लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. आपण केवळ मोठे होत नाही तर वेगाने वाढतो आहोत. जेव्हा भारताचा विकास होतो तेव्हा संपूर्ण जग विकसित होते, असेही मोदी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT