Prime Minister Narendra Modi  Dainik Gomantak
ग्लोबल

''भारतात खऱ्या अर्थाने हे मोदी युग, भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येईल....'', अमेरिकन तज्ज्ञाचं मोठं वक्तव्य

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची स्थिती मजबूत असल्याचे अमेरिकन तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Manish Jadhav

Prime Minister Narendra Modi: नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारताची परराष्ट्र खूप बदलली. यातच आता, दक्षिण आशिया विषयावरील प्रसिद्ध अमेरिकन तज्ञ आणि स्तंभलेखकाने एक मोठी गोष्ट सांगितली आहे. हे निश्चितपणे भारतात 'मोदी युग' आहे. देशातील आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची स्थिती मजबूत असल्याचे अमेरिकन तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येईल, असेही या तज्ज्ञाने भाकित केले. 'वॉल स्ट्रीट जर्नल'चे दक्षिण आशिया विषयावरील स्तंभलेखक आणि 'अमेरिकन एंटरप्राइझ इन्स्टिट्यूट' या थिंक टँकशी संबंधित सदानंद धुमे यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला.

'मोदी राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी'

धुमे म्हणाले की, ''भारतात हे मोदी युग आहे. 2015 पासून अमेरिकेच्या राजकारणात ट्रम्प युग आले, मग ते सत्तेवर असो वा नसो. 2013 पासून भारत स्पष्टपणे मोदी युगात आहे,” ते पुढे म्हणाले की, “तुम्ही त्यांना पसंत करा किंवा त्यांचा तिरस्कार करा, ते राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. इंदिरा गांधींच्या काळापासून आजपर्यंतच्या राजकारणावर नजर टाकली, तर असे लक्षात येईल की, असा कोणताही नेता राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला नाही.''

सरकारने आर्थिक आघाडीवर खूप चांगले काम केले

धुमे पुढे असेही म्हणाले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आर्थिक आघाडीवर खूप चांगले काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक लोकप्रियताही खूप जास्त आहे. जर तुम्ही सर्वेक्षणे बघितली तर, हे सुमारे 80 टक्के आहे, जी जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेपेक्षा कितीतरी जास्त आहे. एक गोष्ट अशीही आहे की, 2014 आणि नंतर 2019 अशा सलग दोन निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसला सावरता आलेले नाही.''

एका परिवाराच्या माध्यमातून चालणारा पक्ष

धुमे म्हणाले की, ''ऐतिहासिकदृष्ट्या भारतात एकाच शक्तिशाली राष्ट्रीय पक्षाची सत्ता दिर्घकाळ राहिली. 60, 70, 80 चे दशक बघितले तर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते आणि आता भाजपचे वर्चस्व आहे.'' ते पुढे असेही म्हणाले की, “भारतातील प्रमुख विरोधी पक्ष, काँग्रेस, जगभरातील यशस्वी राजकीय पक्षांप्रमाणे आपले उत्तराधिकारी नेतृत्व तयार करण्यासाठी कोणतीही यंत्रणा तयार करु शकला नाही. अमेरिकेत लेबर पार्टी असो वा कंझर्व्हेटिव्ह पार्टी किंवा डेमोक्रॅटिक पक्ष. जेव्हा तुम्ही निवडणुकीत पराभूत होतात तेव्हा तुम्हाला नवीन नेतृत्व मिळते. पण काँग्रेसला हे कसे करायचे ते कळत नाही कारण तो एका परिवाराच्या माध्यमातून चालणारा पक्ष बनला आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT