PM Modi America Visit: 'पीएम मोदींचे ऐतिहासिक भाषण ऐकण्यासाठी आम्ही...,' अमेरिकन खासदार म्हणाले; पाहा व्हिडिओ

PM Modi America Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जूनला अमेरिकेला पोहोचणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची संपूर्ण अमेरिका वाट पाहत आहे.
PM Modi America Visit
PM Modi America VisitDainik Gomantak

PM Modi America Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जूनला अमेरिकेला पोहोचणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची संपूर्ण अमेरिका वाट पाहत आहे. यूएस काँग्रेसच्या बाहेर अमेरिका आणि भारताचे झेंडे फडकावले जात आहेत. तिथले खासदार पीएम मोदींच्या दौऱ्याबाबत अतिशय उत्साही संदेश देत आहेत. भारत-यूएस संबंधांसाठी हा दौरा मैलाचा दगड ठरेल, असे अनेक अमेरिकन नेत्यांनी म्हटले आहे. अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय राहतात. ते ही आतापासून पंतप्रधानांची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. अमेरिकन नेते ग्रेगरी मीक्स यांनी 'जय हिंद' म्हणत आपले भाषण केले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याबद्दल मी खूप आनंदी आहे. त्याचबरोबर, त्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.

ग्रेगरी मीक्स म्हणाले की, यूएस संसदेत पंतप्रधान मोदींच्या संबोधनाबद्दल मी खूप उत्साहित आहे. ते पुढे म्हणाले की, या संयुक्त बैठकीमध्ये भारताची दृष्टी आणि अमेरिकेसोबतचे संबंध, शांतता, समृद्धी आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील लोकशाही मूल्ये आणि स्थिरता या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. अमेरिकेत प्रचंड उत्साह आहे. 21 जून हा जागतिक योग दिन आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी अमेरिकेतून सहभागी होणार आहेत.

PM Modi America Visit
PM Modi US Visit: अभिमानास्पद! व्हाइट हाउसच्या बाहेर फडकला तिरंगा, पंतप्रधान मोंदीच्या दौऱ्याची उत्सुकता शिगेला...

अमेरिकन खासदार ग्रेग लँड्समन यांनीही पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याबाबत संदेश पाठवला आहे. पुढील आठवड्यात वॉशिंग्टन डीसी येथे पंतप्रधान मोदींच्या आगमनाची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिका आणि जगभरातील लोकशाही बळकट करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये भारत हा महत्त्वाचा भागीदार आहे. ते म्हणाले की, पीएम मोदींचा हा ऐतिहासिक दौरा आमच्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांना घट्ट करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

PM Modi America Visit
US President Joe Biden: 80 वर्षीय जो बायडन पुन्हा अडखळले, 2 वर्षातील 5 वी घटना; Video

अमेरिकेचे खासदार ट्रॉय ए. कार्टर यांनी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याबद्दल म्हटले आहे की, आरोग्य, तंत्रज्ञान आणि विकास यासारख्या अनेक क्षेत्रात अमेरिका आणि भारत यांच्यात खूप महत्त्वाचे संबंध आहेत. आम्ही एकमेकांचे सहकारी आहोत. जो बायडन आणि जिल बायडन यांनी पंतप्रधान मोदींना अमेरिकेत आमंत्रित केल्याचा मला आनंद आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींचे संबोधन ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे.

यूएस काँग्रेसचे सदस्य रिच मॅककॉर्मिक म्हणाले की, पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर येत असल्याने मी उत्साहित आहे. भारत आणि अमेरिकेत महत्त्वाचे सामरिक संबंध आहेत. दोन्ही देशांमधील सद्भावना वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी अमेरिकेत येत आहेत.

PM Modi America Visit
PM Modi US Visit: अभिमानास्पद! व्हाइट हाउसच्या बाहेर फडकला तिरंगा, पंतप्रधान मोंदीच्या दौऱ्याची उत्सुकता शिगेला...

आणखी एका अमेरिकन खासदाराने सांगितले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जून रोजी अमेरिकेत येत आहेत. यावेळी ते अमेरिकेन काँग्रेसला संबोधित करतील. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या लोकशाही देशाशी संबंध दृढ करण्याची ही एक उत्तम संधी असेल. दोन्ही देशातील लोकशाही मूल्यांचा आदर करण्यावर आमचा विश्वास आहे.

दुसरीकड़े, एक अतिशय सुंदर व्हिडिओ समोर आला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या दाऊदी बोहरा मुस्लिम समुदायाने पंतप्रधान मोदींना एक संदेश दिला आहे. लहान मुलांनी पीएम मोदींचे स्वागत केले. अमेरिकेत राहणारे भारतीयही पंतप्रधानांची आतुरतेने वाट पाहत आहेत. नायगरा फॉल्सवरुन लोक पंतप्रधान मोदींना संदेश देत आहेत. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवरुन लोक संदेश पाठवत आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com