Congressman Thanedar
Congressman Thanedar  Dainik Gomantak
ग्लोबल

''हा धर्म कोणावरही हल्ला करत नाही, पण...'' अमेरिकेतील हिंदूंवरील वाढत्या हल्ल्यांबाबत भारतीय वंशाच्या खासदाराने केली ही मागणी

Manish Jadhav

Indian American Congressman Thanedar: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांना निशाणा बनवलं जात आहे. अमेरिकेत आतापर्यंत भारतीय वंशाच्या 11 विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली. त्याचबरोबर अमेरिकेत हिंदू मंदिरांवरील हल्लेही वाढले आहेत. भारतीय-अमेरिकन खासदार ठाणेदार यांनी याबाबत चिंता व्यक्त केली.

चार खासदारांनी न्याय विभागाला पत्र लिहिले

सोमवारी वॉशिंग्टनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, ''देशात हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवरुन खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.'' ठाणेदार आणि इतर चार भारतीय अमेरिकन खासदार - रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती, अमी बेरा आणि प्रमिला जयपाल - यांनी अलीकडेच न्याय विभागाला पत्र लिहून हिंदू मंदिरे आणि प्रार्थनास्थळांवरील हल्ल्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

आमच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले होत आहेत: ठाणेदार

ते पुढे म्हणाले की, "हिंदू असल्याने मला हिंदू धर्म काय हे माहित आहे. हा अतिशय शांतताप्रिय धर्म आहे. हा इतरांवर हल्ला करणारा धर्म नाही. मात्र, हिंदूबाबत चुकीचे चित्र रंगवले जात आहे. जाणूनबूजून मंदिरांना निशाणा बनवलं जातं आहे. हल्ल्यांच्या आरोपींवर गुन्हे देखील दाखल केले जात नाहीत.''

ठाणेदार यांनी बायडन प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला

ठाणेदार पुढे म्हणाले की, 'हिंदू समुदयाला आपली काळजी करणारे कोणीच नाही असे वाटते. समुदाय भीतीच्या छायेत जगत आहे.' ठाणेदार पुढे असेही म्हणाले की, 'फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि न्याय विभाग यांच्यात समन्वय राखण्याची गरज आहे.'

आम्ही न्यायाची मागणी करत आहोत: भारतीय-अमेरिकन खासदार

ठाणेदार म्हणाले की, 'यावेळी हिंदू समुदयातील लोकांना एकत्र येऊन सांगावे लागेल की आम्ही देशात समानतेची मागणी करत आहोत.' ते पुढे म्हणाले की, ''आम्ही इथे न्यायाची मागणी करत असून यापुढे असा द्वेष खपवून घेणार नाही. न्याय विभागाला पत्र लिहून हिंदू समुदयाला इथे शांततेने राहण्याचा अधिकार मिळावा यासाठी प्रशासनावर दबाव आणू.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

Goa Top News: म्हादई पात्राची पाहणी, अपघात आणि मॉन्सून अपडेट; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT