Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

Donald Trump: 'आणखी खरतनाक हल्ले केले जातील...', इस्त्रायलच्या कारवाईनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला खुली धमकी

Donald Trump Warns Iran: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी इराणला इशारा दिला. अणु करार करण्याचे त्यांनी आवाहन केले. जर राजनैतिक चर्चा अयशस्वी ठरल्या तर आणखी घातक हल्ले केले जातील अशी धमकी ट्रम्प यांनी इराणला दिली.

Manish Jadhav

मध्य पूर्व आशियावर पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटू लागले आहेत. अमेरिका आणि इराणमधील अणुकराराला सातत्याने विलंब होत असताना इस्रायलने शुक्रवारी (13 जून) इराणवर मोठी लष्करी कारवाई केली. पहाटे इस्रायलने इराणचे 4 अणु आणि 2 लष्करी तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात अनेक इराणी लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू झाला. त्याचवेळी, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला खुली धमकी दिली.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

दरम्यान, जर राजनैतिक चर्चा अयशस्वी ठरल्या तर आणखी घातक हल्ले केले जातील अशी धमकी ट्रम्प यांनी इराणला दिली. इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी ही खुली धमकी दिली. ट्रम्प म्हणाले की "हा नरसंहार थांबवण्यासाठी अजूनही वेळ आहे. आगामी हल्ले आणखी खतरनाक असतील."

'मी इराणला संधी दिली'

ट्रम्प पुढे म्हणाले की, "मी इराणला करार करण्यासाठी अनेक संधी दिल्या. मी त्यांना कडक शब्दातही सांगितले, पण त्यांनी कधीही ऐकले नाही. अमेरिका प्राणघातक लष्करी उपकरणे बनवतो आणि अशा लष्करी उपकरणांचा इस्रायलकडे मोठा साठा आहे. यापुढे हल्ले आणखी तीव्र केले जातील. काही इराणी कट्टरपंथी मोठ्या विद्वेषाने बोलले पण त्यांना पुढे काय होणार हे माहिती नव्हते."

इस्रायली हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले

इस्रायलने शुक्रवारी इराणविरुद्ध 'ऑपरेशन रायझिंग लायन' सुरु केले. या कारवाईचा उद्देश इराणच्या अणु, क्षेपणास्त्र आणि लष्करी संकुलाला लक्ष्य करणे आहे. या कारवाईत इस्रायलने इराणचे अनेक प्रमुख लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांना ठार मारले. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले की, 'इराणच्या अणुशास्त्र कार्यक्रमाच्या केंद्रावर हल्ला करण्यात आला आहे.' नेतान्याहू यांनी इराणच्या अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांना इस्रायलच्या अस्तित्वासाठी धोका असल्याचे म्हटले.

इराणनेही इस्रायलवर ड्रोन डागले

दुसरीकडे, इराणनेही इस्रायलला कठोर शिक्षा भोगावी लागेल असा इशारा दिला आहे. इराणी सशस्त्र दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिका आणि इस्रायल दोघांनाही याची मोठी किंमत मोजावी लागेल. इस्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार, हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने 100 हून अधिक ड्रोन डागले. तथापि, हे इस्रायलच्या सीमेबाहेर पाडण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

SCROLL FOR NEXT