MRI Machine Dainik Gomantak
ग्लोबल

सोन साखळीनं केला घात! एमआरआय मशीनने खेचलं अन् क्षणात 'त्याचा' मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

MRI Accident New York: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे.

Manish Jadhav

MRI Accident New York: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. नासाउ ओपन एमआरआय (Nassau Open MRI) येथे एमआरआय स्कॅनसाठी गेलेल्या 61 वर्षीय व्यक्तीचा एमआरआय मशीनने खेचल्यामुळे मृत्यू झाला. हा व्यक्ती गळ्यात मोठी धातूची साखळी (नेकलेस) घालून एमआरआय रुममध्ये गेला होता, ज्यामुळे मशीनच्या शक्तिशाली चुंबकीय शक्तीने त्याला खेचून घेतले आणि त्याचा जीव गेला.

नेमके काय घडले?

नासाउ काउंटी पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी हा व्यक्ती एमआरआय रूममध्ये गेला होता. त्याच्या गळ्यातील नेकलेसमुळे मशीनच्या शक्तिशाली चुंबकीय बलाने त्याला आत खेचले. या घटनेनंतर काही वेळातच त्याचे शरीर कमजोर पडले आणि गुरुवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी (Police) आणि त्याच्या पत्नीने एका स्थानिक वाहिनीशी बोलताना दिली. दुसरीकडे, मृत व्यक्तीचे नाव सार्वजनिक करण्यास नासाउ काउंटी पोलीस विभागाने शनिवारी परवानगी दिली नाही.

पत्नीने सांगितला थरारक अनुभव

एड्रिएन जोन्स-मॅकएलिस्टर मृताची पत्नी यांनी न्यूज 12 लाँग आयलंडला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्या स्वतः आपल्या गुडघ्याचा एमआरआय स्कॅन करत होत्या. त्यावेळी त्यांनी तंत्रज्ञांना (Technician) त्यांचे पती कीथ मॅकएलिस्टर यांना टेबलवरुन खाली उतरण्यास मदत करण्यास सांगितले.

जोन्स-मॅकएलिस्टर यांच्या म्हणण्यानुसार, तंत्रज्ञ त्यांच्या पतीजवळ पोहोचताच, "अचानक मशीनने त्यांना फिरवले, त्यांना आत खेचले आणि त्यांचे एमआरआय स्कॅन सुरु केले." त्या पुढे म्हणाल्या, "मी लॅब तंत्रज्ञांना ओरडून सांगितले, 'तुम्ही मशीन बंद करु शकता का, 911 ला कॉल करु शकता का, काहीतरी करा, ही मशीन बंद करा.'"

एमआरआय मशीनमुळे मृत्यूची ही पहिली घटना नाही

न्यूयॉर्कमध्ये एमआरआय मशीनमुळे झालेला हा पहिलाच मृत्यू नाही. 2001 मध्ये, क्रोटन-ऑन-हडसन येथील 6 वर्षांच्या माइकल कोलोम्बिनीचा वेस्टचेस्टर मेडिकल सेंटरमध्ये मृत्यू झाला होता, जेव्हा एमआरआयच्या 10 टनाच्या इलेक्ट्रोमॅग्नेटने खेचलेला एक ऑक्सिजन टँक उडून चेंबरमध्ये पडला होता. 2010 मध्ये, वेस्टचेस्टर काउंटीमधील रेकॉर्डनुसार, या प्रकरणात कुटुंबाने 29 लाख अमेरिकन डॉलरमध्ये प्रकरण मिटवले होते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल इमेजिंग अँड बायोइंजिनियरिंगनुसार, एमआरआय मशीनमध्ये मजबूत चुंबकीय क्षेत्राचा वापर करतात, जे "लोह, काही स्टील आणि इतर चुंबकीय वस्तूंवर अत्यंत शक्तिशाली बल (पॉवरफुल फोर्स) लावतात". या मशीन्स "इतक्या मजबूत आहेत की, एक व्हीलचेअरला खोलीत इकडे-तिकडे फेकू शकतात."

दरम्यान, या घटनेमुळे एमआरआय केंद्रांमध्ये सुरक्षा नियमांचे कठोरपणे पालन करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनीही एमआरआय चाचणीपूर्वी सर्व धातूच्या वस्तू काढून ठेवण्याच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Final Host Nation: भारताला पुन्हा डावललं, पुढील 3 'WTC Final'चं यजमानपद 'या' देशाकडे; ICC ची मोठी घोषणा

India Justice Report: देशात न्याय वितरणात गोव्याची स्थिती बिकट, CM सावंत यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; इंडिया जस्टिस रिपोर्टमधून खुलासा

Indonesia Ship Fire: इंडोनेशियात जहाजाला भीषण आग, प्रवाशांनी समुद्रात घेतल्या उड्या; थरारक VIDEO व्हायरल!

Virat Kohli 5 Morning Habits: तुम्हीही व्हा विराटसारखे 'सुपरफिट'! कोहलीच्या फिटनेसचे रहस्य उघड, त्याची सकाळची 'ही' खास सवय माहितीय का?

Health Tips: वारंवार जुलाब लागणं असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण! इन्फेक्शन समजून दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

SCROLL FOR NEXT