Court Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेत भारतीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा, चाकूने 17 वार करुन पत्नीची केली हत्या

America Crime News: फिलिप मॅथ्यूजने शुक्रवारी सांगितले की, पत्नी मेरीन जॉयच्या हत्येप्रकरणी तो कोणताही खटला लढवणार नाही.

Manish Jadhav

America Crime News: अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात एका भारतीय व्यक्तीला 2020 मध्ये आपल्या 26 वर्षीय पत्नीची 17 वेळा चाकूने वार करुन निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

एका मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 'सन सेंटिनेल' या वृत्तपत्रानुसार, फिलिप मॅथ्यूजने शुक्रवारी सांगितले की, पत्नी मेरीन जॉयच्या हत्येप्रकरणी तो कोणताही खटला लढवणार नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोर्टाने (Court) मॅथ्यूला फाशीची शिक्षा दिली नाही कारण त्याने खटला न लढण्याचा निर्णय घेतला. असे सांगितले जात आहे की, जॉय त्याच्या पत्नीसोबत खूश नव्हता. त्याला पत्नीसोबतचे नाते तोडायचे होते.

म्हणून, त्याच्या नियोजनाचा एक भाग म्हणून, त्याने आपल्या पत्नीला ब्रॉवर्ड हेल्थ कोरल स्प्रिंग्सच्या पार्किंगमध्ये नेले. मेरीन जॉय ब्रॉवर्ड हेल्थ कोरल स्प्रिंग्स हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करायची.

मॅथ्यूने पत्नीची निर्घृण हत्या केली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅथ्यूजने ब्रॉवर्ड हेल्थ कोरल स्प्रिंग्स हॉस्पिटलच्या (Hospital) पार्किंगमध्ये मेरीनची कार अडवली. यानंतर त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला आणि नंतर तिला कारने चिरडले.

दरम्यान, या खटल्यात सुटका होण्याची शक्यता नसताना मॅथ्यूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. प्राणघातक शस्त्राने गंभीर हल्ला केल्याबद्दल त्याला कमाल पाच वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली होती.

जन्मठेपेच्या शिक्षेच्या निश्चिततेमुळे आणि प्रतिवादीने त्याचा अपील करण्याचा अधिकार सोडल्यामुळे, फाशीची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे स्टेट अटॉर्नी कार्यालयाच्या प्रवक्त्या पॉला मॅकमोहन यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

Ashok Gajapathi Raju: 17 वर्षे मंत्रिपद, 7 वेळा आमदार, एकदा खासदारकी भूषवलेले व्यक्तिमत्व; गोव्याचे 20 वे राज्यपाल अशोक गजपती राजू

SCROLL FOR NEXT