Earthquake In America  Dainik Gomantak
ग्लोबल

Earthquake In America: अलास्कात जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के, रिश्टल स्केलवर 7.4 तीव्रता

अलास्कात जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असून त्सुनामीचाही इशाला दिला आहे.

Puja Bonkile

Earthquake In America: अमेरिकेतील अलास्काच्या किनारपट्टीवर आज भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. रिश्टल स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.4 असल्याचे सांगण्यात आले आहे. 

या भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की त्यांच्यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपामुळे भीषण विध्वंस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण अद्याप भूकंपामुळे किती नुकसान झाले याची नेमकी माहिती समोर आलेली नाही.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या मते, रविवारी दुपारी अलास्कामध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप जाणावला आहे. भूकंपानंतर किनारी भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून, त्यानंतर भीतीचे वातावरण तयार झाले आहे. 

  • दोन आठवड्यांपूर्वीही जाणवले सौम्य भूकंपाचे धक्के

दोन आठवड्यांपूर्वी अलास्कातील अँकोरेजमध्ये एक छोटासा भूकंप झाला होता. यूएसजीएसनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू शहराच्या दक्षिणेस सुमारे 12 मैलांवर होता. USGS द्वारे प्रदान केलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की भूकंप 17.5 मैल खोलीवर झाला आहे. अलास्का पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये येते, जी भूकंपीय क्रियाकलापांमध्ये खूप सक्रिय मानली जाते. अशावेळी येथे भूकंपाचा धोका कायम आहे.

  • 1964 मध्ये येथे भीषण भूकंप झाला होता 

1964 मध्ये अलास्कामध्ये 9.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता. जो उत्तर अमेरिकेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप मानला जातो. त्यानंतर भूकंप आणि सुनामीमुळे 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. भूकंपाचे तीव्र धक्के पाहता लोकांना किनारपट्टीपासून दूर सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे. 

  • भूकंप आल्यावर काय करावे आणि काय करू नये?

धक्के जाणवल्यास ताबडतोब जमिनीवर बसा आणि आपले डोके खाली टेकवा.

मजबूत टेबल किंवा फर्निचरच्या आवरणाखाली स्वतःचा बचाव करावा.

याशिवाय घरातील वडीलधाऱ्यांची आणि मुलांची विशेष काळजी घ्यावी. 

त्यांना प्रथम बचावाच्या पद्धती सांगून त्यांचे संरक्षण करा. 

जर भूकंपाचा धक्का खूप तीव्र असेल तर काळजीपूर्वक घरातून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानावर किंवा रस्त्यावर जावे. 

याशिवाय भूकंपाच्या वेळी काच, खिडकी, पंखा किंवा झुंबर इत्यादी जड आणि पडणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा.

  • भूकंपाचे शास्त्रीय कारण देखील जाणून घ्या

भूकंप कसे आणि का होतात हे शास्त्रीयदृष्ट्या समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीची रचना समजून घ्यावी लागेल. वास्तविक ही पृथ्वी टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. त्याच्या खाली द्रव लावा आहे.

या प्लेट्स सतत तरंगत राहतात आणि अनेक वेळा एकमेकांवर आदळतात. वारंवार आदळल्यामुळे अनेक वेळा प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जास्त दाब आल्यावर या प्लेट्स तुटू लागतात. अशा स्थितीत खालून बाहेर पडणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि या गडबडीनंतर भूकंप होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT