Crime Dainik Gomantak
ग्लोबल

UN Report: महिलांसाठी घरचं बनले सर्वात धोकादायक ठिकाण; संयुक्त राष्ट्रांच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा!

Women Killed at Home: गेल्या वर्षी (2023) दररोज सरासरी 140 महिला आणि मुलींची त्यांच्या घरात पार्टनर किंवा कुटुंबातील सदस्याकडून हत्या करण्यात आली.

Manish Jadhav

Women Killed at Home: महिलांसाठी घर हे सर्वात धोकादायक ठिकाण बनले आहे. गेल्या वर्षी (2023) दररोज सरासरी 140 महिला आणि मुलींची त्यांच्या घरात इंटीमेट पार्टनर किंवा कुटुंबातील सदस्याकडून हत्या करण्यात आल्याचे संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 2022 मध्ये हा आकडा 48,800 असण्याचा अंदाज आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दोन एजन्सींनी सोमवारी सांगितले की, गेल्या वर्षी सरासरी 140 महिला आणि मुलींची त्यांच्या घरात पार्टनर किंवा कुटुंबातील सदस्यांकडून हत्या करण्यात आली.

घरगुती हिंसाचाराचे प्रमाण दरवर्षी वाढतयं

युनायटेड नेशन्स वुमन (यूएन वुमन) आणि युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राइम यांनी सांगितले की, 2023 मध्ये जागतिक स्तरावर सुमारे 51,100 महिला आणि मुलींची त्यांच्या पार्टनर किंवा कुटुंबातील सदस्यांकडून हत्या करण्यात आली. 2022 मध्ये हा आकडा 48,800 असण्याचा अंदाज आहे. याचाच अर्थ काळाच्या ओघात महिला आणि मुलींवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये त्यांच्याच घरात वाढ होत आहे.

लिंग आधारित हिंसा

दोन्ही एजन्सींनी यावर जोर दिला की "सर्वत्र महिला आणि मुली लिंग-आधारित हिंसाचाराच्या या अत्यंत घातक प्रकारामुळे प्रभावित होत आहेत आणि कोणताही प्रदेश यापासून सुटलेला नाही. घर हे महिला आणि मुलींसाठी सर्वात धोकादायक ठिकाणे बनले आहे.''

आफ्रिकेत सर्वाधिक हत्या

रिपोर्टनुसार, पार्टनर आणि कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या खुनाच्या घटना आफ्रिकेत सर्वाधिक आहेत. 2023 मध्ये अंदाजे 21,700 महिलांनी आपला जीव गमावला. आफ्रिका त्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत बळींच्या संख्येतही आघाडीवर असून हा दर 100,000 लोकांमागे 2.9 बळी एवढा आहे.

अमेरिकेतही महिलांच्या हत्या सर्वाधिक

रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी हा दर अमेरिकेतही खूप जास्त होता, जिथे 1 लाखामागे 1.6 महिला बळी होता. तर ओशनियामध्ये हा दर एक लाखामागे 1.5 इतका होता. आशियामध्ये हा दर खूपच कमी होता, जिथे प्रति 100,000 बळी 0.8 होते, तर युरोपमध्ये हा दर प्रति लाख 0.6 एवढा होता.

पार्टनरकडून हत्या!

रिपोर्टनुसार, युरोप आणि अमेरिकेत महिलांची जाणीवपूर्वक हत्या त्यांच्या पार्टनरने केल्याचे समोर आले. याउलट पुरुषांच्या हत्येच्या बहुतांश घटना कुटुंबाबाहेर घडतात. रिपोर्टमध्ये पुढे म्हटले की, "बहुसंख्य हत्येचे बळी पुरुष आणि मुले असले तरी, खाजगी क्षेत्रात प्राणघातक हिंसाचारामुळे महिला आणि मुली देखील प्रभावित होतात."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT