UN Report: 'हा' देश महिलांना देतोय सर्वात वाईट वागणूक, यूएनने जारी केला अहवाल

Taliban: तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर हा देश महिलांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे.
Muslim Women
Muslim WomenDainik Gomantak
Published on
Updated on

International Women's Day: जगभरातून महिलांवरील भेदभाव आणि हिंसाचाराच्या बातम्या येत राहतात, मात्र तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर हा देश महिलांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. बुधवारी, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, संयुक्त राष्ट्राने (UN) देखील हे सत्य मान्य केले.

दरम्यान, तालिबानच्या (Taliban) ताब्यानंतर अफगाणिस्तानातील महिलांना त्यांचे मूलभूत अधिकारही मिळत नसल्याचे संयुक्त राष्ट्राने बुधवारी सांगितले. अफगाणिस्तान हा महिला आणि मुलींसाठी जगातील सर्वात अत्याचारी देश बनला आहे. संयुक्त राष्ट्राने यासंदर्भात एक अहवाल जारी केला आहे.

Muslim Women
Taliban: भयानक! चोरी केली म्हणून तालिबानने भर स्टेडियममध्ये दिली 'ही' शिक्षा...

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जारी केलेल्या निवेदनात, यूएन मिशनने म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये नवीन शासनापासून महिलाविरोधी कायदे लागू झाले आहेत. त्यामुळे तेथील महिलांना घरातच कैद राहावे लागत आहे.

ऑगस्ट 2021 मध्ये सत्ता काबीज केल्यानंतर तालिबानने महिलांकडून (Women) त्यांचे हक्क काढून घेण्याचे काम केले आहे. दोन दशकांच्या युद्धानंतर अमेरिकन आणि नाटो सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतली आणि हा देश पुन्हा तालिबानच्या ताब्यात गेला.

Muslim Women
Taliban China: ड्रॅगनची तेल निती ! तालिबान-चीन आले एकत्र; काय होणार भारतावर परिणाम

तालिबान आपल्या आश्वासनापासून दूर गेले

संयुक्त राष्ट्रांच्या विधानानुसार, ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर तालिबानने संयत भूमिका घेण्याचे आश्वासन दिले होते, परंतु असे असतानाही त्यांनी कठोर नियम लागू केले.

संयुक्त राष्ट्र महासचिव आणि अफगाणिस्तानमधील मिशनचे प्रमुख यांच्या विशेष प्रतिनिधी रोजा ओतुनबायेवा यांनी सांगितले की, अफगाण महिला आणि मुलींवरचे निर्बंध पाहून वाईट वाटते. सध्या तालिबानमध्ये महिलांबाबत अनेक कायदे लागू करण्यात आले आहेत, ज्यांचा विरोधही दिसून आला.

Muslim Women
Taliban: 'त्याने किती बॉम्ब फेकले...,' मुलींच्या शिक्षणावर बंदी घालणाऱ्या मंत्र्यांने तोडले अकलेचे तारे

तालिबानने स्पष्टीकरण दिले

विद्यापीठांमध्ये महिलांच्या शिक्षणावर बंदी घालण्याबाबत तालिबान सरकारने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, शिकवले जाणारे काही विषय अफगाण आणि इस्लामिक मूल्यांनुसार नाहीत. तथापि, आंतरराष्ट्रीय निषेध असूनही, तालिबानने आपल्या कठोर भूमिकेपासून मागे हटण्याची चिन्हे दर्शविली नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com