Aliens Dainik Gomantak
ग्लोबल

पॅसिफिक महासागरात एलियन्सच्या जहाजांची टक्कर! शास्त्रज्ञाचा दावा

पॅसिफिक महासागरात (Pacific Ocean) एलियन टेक्नॉलॉजी क्रॅश झाल्याचा दावा हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ एवी लोएब यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

पॅसिफिक महासागरात एलियन टेक्नॉलॉजी क्रॅश झाल्याचा दावा हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ एवी लोएब यांनी केला आहे. लोएब आपला मुद्दा खरा करण्यासाठी एक मिशन आखत आहेत. खगोलभौतिकशास्त्रज्ञ एवी लोएब (Avi Loeb) यांनी दावा केला की, 'पापुआ न्यू गिनीच्या किनाऱ्यापासून दूर असलेल्या मानुस बेटाजवळ एक प्रकारचे अवकाशयान पृथ्वीवर आदळले.'

तथापि, यूएस स्पेस कमांडच्या अहवालात असे म्हटले आहे की, प्रत्यक्षात पृथ्वीवर आदळणारी गोष्ट ही उल्का होती. एवी लोएब यांची ओळख एक वादग्रस्त शास्त्रज्ञ म्हणून केली जाते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खगोलशास्त्र आणि अवकाशाशी संबंधित गोष्टींमध्ये घालवले आहे. याशिवाय त्यांनी दिलेल्या सिद्धांताबाबत नेहमीच वाद होतात.

खगोलभौतिकशास्त्रज्ञ एवी लोएब यांनी एका लेखात म्हटले आहे की, 'बाह्य अवकाशातील उल्कांचा शोध आपल्याला एका नवीन संशोधनाकडे (Research) घेऊन जाईल. परंतु मूळ प्रश्न हा आहे की, अशा गोष्टींपासून उल्का बनवता येतो का, ज्यामुळे आपल्याला कृत्रिम असण्याचे संकेत मिळतात.

एवी लोएब पुढे म्हणाले की, ''काही तंत्रज्ञानाचे घटक पृथ्वीशी टक्कर दिल्यानंतर जिवंत राहिले असावेत. लोएब त्यांच्या सिद्धांताबद्दल अधिक माहिती गोळा करु इच्छितात. मला पॅसिफिक महासागराच्या खोलीतून एका खास प्रकारच्या चुंबकाद्वारे 'एलियन टेक्नॉलॉजी' काढायची आहे.''

खगोलभौतिकशास्त्रज्ञ एवी लोएब यांनी पुढे सांगितले की, माझे स्वप्न आहे की, मी बाहेरील जगातून आलेले एलियन तंत्रज्ञानाचे काही तुकडे माझ्या हातात घेऊ शकेन.' लोएब यांची असा दावा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी ओउमुआमुआला बाहेरील जगाचे स्पेसक्राफ्ट देखील म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT