Parag Agrawal Dainik Gomantak
ग्लोबल

ट्विटर खरेदीच्या कराराला एलन मस्क यांच्याकडून स्थगिती; पराग अग्रवाल यांची माहिती

अग्रवाल यांनी संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती देणारे केले अनेक ट्वीट

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपुर्वी एलन मस्क यांनी ट्विटर खरेदीबाबत खरेदीची घोषणा केली होती. यानंतर ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी नविन खुलासा केला आहे. अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योजक आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा करार तात्पुरता स्थगित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती देणारे अनेक ट्वीट केले आहेत.

अग्रवाल म्हणाले की, गेल्या काही आठवड्यात बरंच काही घडलं आहे. सध्या मी केवळ कंपनीच्या कामावर लक्ष केंद्रित केलं आहे. यावेळी मी फार काही सार्वजनिक बोलू इच्छित नाहीये, पण मी माझी बाजू मांडतोय. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, ” काल आम्ही आमच्या नेतृत्व आणि इतर संचालक मंडळाबाबत बदल जाहीर केले आहेत. लोकांसाठी बदल स्वीकारणं हे नेहमीच कठीण असतं असं ही ते यावेळी म्हणाले आहेत.

खरेदीची प्रक्रिया नेमकी काय आहे

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे देखील मालक होणार आहेत. ट्विटरची संपूर्ण मालकी आता मस्क यांच्याकडे जाणार आहे. त्यांनी तब्बल 44 बिलियन डॉलर्सला (जवळपास 3368 अब्ज रुपये) ट्विटरला खरेदी करणार असल्याचं ही स्पष्ट केलं आहे.

यांनतर सोशल मीडियावर यूजर्सकडून मजेशीर प्रतिक्रिया समोर येत आहे. याशिवाय मस्क यांचे 5 वर्षांपूर्वीच एक ट्विट देखील व्हायरल होत आहे. दरम्यान, मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटरची 9.2टक्के हिस्सेदारी खरेदी केली होती. आता 44 बिलियन डॉलर्सला त्यांना संपूर्ण कंपनीला खरेदी केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

FIR Case: 2017 च्या विमान प्रकरणात मोठा न्यायालयीन निर्णय; राज्यपालांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील मागणी फेटाळली

Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

Pakistan Players Central Contract: "सॅलरी पाहिजे? मग आधी खेळायला शिका!", मोहसिन नक्वीने रोखले खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स; काढला नवा फतवा

Healthcare Facilities: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मोठा बदल! नर्सिंग महाविद्यालय जुन्या हॉस्पिसिओ इमारतीत हलविणार

SCROLL FOR NEXT