Shireen Abu Aqleh Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-अमेरिकेत वाढला तणाव, पत्रकाराच्या मृत्यूचे ठरले कारण !

Al Jazeera journalist s Death: अमेरिकेच्या या तपासात इस्रायल सहकार्य करणार नाही.

दैनिक गोमन्तक

Al Jazeera journalist s Death: या वर्षी मे महिन्यात अल जझीराच्या पॅलेस्टिनी-अमेरिकन रिपोर्टर शिरीन अबू अकलेह इस्त्रायली कारवाईत मारल्या गेल्या. अकलेह यांच्या मृत्यूच्या तपासावरुन इस्रायल आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढत आहे. अमेरिकेने गंभीर चूक केल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गँट्झ यांनी सोमवारी सांगितले की, अमेरिकेच्या न्याय विभागाने याबाबत चौकशी सुरु केली आहे, जी पूर्णपणे चुकीची आहे. अमेरिकेच्या या तपासात इस्रायल सहकार्य करणार नाही.

दरम्यान, या प्रकरणी इस्रायली लष्कराने एक निवेदन जारी केले होते की, इस्रायली सैनिकांच्या गोळीबारात शिरीन अबू अकलेह यांचा जीव गेला असण्याची शक्यता आहे, परंतु पॅलेस्टिनी सैनिकांच्या गोळीबारात अकलेह यांचा जीव गेला असण्याचीही शक्यता आहे. इस्रायलने (Israel) म्हटले की, आयडीएफने या प्रकरणाचा सखोल तपास केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाचा अहवाल अमेरिकेला (America) देण्यात आला आहे.

दुसरीकडे, इस्रायलने म्हटले की, 'आम्ही IDF च्या सैनिकांच्या (Soldiers) पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.' इस्रायलने आपल्या सैनिकांविरुद्ध कोणतीही बाह्य चौकशी स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे झाल्यास तो देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये बाह्य हस्तक्षेप मानला जाईल.

तसेच, अकलेह यांच्यावर गोळी झाडली गेली तेव्हा त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट आणि हेल्मेट घातले होते. त्यावेळी पत्रकार जेनिन निर्वासित छावणीतील लोकांशी संवाद साधत होत्या. या घटनेनंतर इस्रायलने म्हटले होते की, आमच्या एका जवानाने चुकून गोळीबार केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मतचोरी करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न" प्रियांका गांधी-वद्रा यांची 'NDA'वर टीका; 65 लाख नावे वगळल्याचा आरोप

Department of Animal Husbandry: पशुसंवर्धन खाते प्रमुखांविना ठप्प, कामधेनू सुधारित योजनेसह अनेक योजना प्रभावित

Goa Today's News Live: बांबोळीत पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकली बस

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन'! गुरुवारी 'या' 3 राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, परिश्रमाचे उत्तम फळ मिळणार

Night Vigil App: तंत्रज्ञानामुळे रात्रीची सुरक्षा होणार अधिक सक्षम, विद्यार्थ्यांनी बनवलेले 'नाईट व्हिजिल' ॲप पोलिसांसाठी नवे हत्‍यार

SCROLL FOR NEXT