Israel Election Result: इस्त्रायलमध्ये गेल्या काही वर्षातील सततच्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभुमीवर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आता लोकांनी नवे स्थिर सरकार निवडून दिले आहे. इस्त्रायलमध्ये माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांचेच सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे.
गेल्या तीन वर्षात इस्त्रायलमध्ये पाचव्यांदा सार्वत्रिक निवडणूक झाली आहे. या निवडणुकांमध्ये एकाही पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे विविध आघाड्या करून स्थापन झालेली सरकारे फार काळ टिकली नव्हती. थोड्याशा मतभेदांवरून ही सरकारे पडली होती.
आता मात्र नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने 120 पैकी 64 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे नेतान्याहू हेच इस्त्रायलचे पुढचे पंतप्रधान असतील, हे स्पष्ट आहे. 2019 मध्ये 73 वर्षीय नेतान्याहू यांच्यावर लाचखोरी, फसवणूक आणि विश्वासघाताचे आरोप झाले होते. नेतान्याहू यांनी सर्वाधिक काळ सलग 12 वर्षे आणि एकुण 15 वर्षे इस्त्रायलचे पंतप्रधानपद सांभाळले आहे.
इस्त्रायलचे विद्यमान पंतप्रधान याईर लापिड यांनी पराभव स्विकारला आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते नेतान्याहू यांना फोनवरून शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान कार्यालयासह सर्व विभागांतील सत्ता हस्तांतरणाची तयारी करण्याचे निर्देश लापिड यांनी दिले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक नेत्यांनीही बेंजामिन नेतान्याहू यांचे अभिनंदन केले आहे. मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझे प्रिय मित्र नेतान्याहू यांना शुभेच्छा. भारत-इस्त्रायल रणनैतिक सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी आपले संयुक्त प्रयत्न पुढे सुरू ठेवण्यास मी उत्सुक आहेत.
मोदी आणि नेतान्याहू यांची मैत्री उत्तम आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा भेटी झाल्या आहेत. चर्चा झाली आहे. इस्त्रायल भारताचा चांगला मित्र असून प्रत्येक महत्वाच्या वेळी इस्त्रायलने भारताला मदत केली आहे. मोदींनी लापिड यांचेही आभार मानले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.