Pakistan Crisis: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानातील मुस्लिमही चिंतेत आहेत. देशातील अल्पसंख्याक अहमदिया मुस्लिमांचा सरकारी संस्था आणि तालिबानकडून छळ होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
अहमदिया मुस्लिम समुदायाला त्यांच्या धार्मिक श्रद्धेमुळे कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पंजाबमधील गुजरनवाला येथील तलवंडी खजुरवाली जिल्ह्यात अहमदिया समुदायाचे कब्रस्तान आहे, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
नुकतेच तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानने येथील कबरींची विटंबना केली. सोबतच या प्रकरणी अद्याप पोलिसात (Police) तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचेही बोलले जात आहे.
वृत्तानुसार, पंजाब प्रांतात 75 वर्षीय डॉक्टर रशीद अहमद यांची TLP धर्मांधांनी हत्या केली. विशेष म्हणजे, अहमद यांनी नॉर्वेचे नागरिकत्व घेतले होते, मात्र ते फार पूर्वीच पाकिस्तानात (Pakistan) परतले होते. इथे त्यांनी होमिओपॅथी दवाखाना सुरु केला, जिथे लोकांना ते मोफत वैद्यकीय सुविधा देत होते.
दुसरीकडे, मुख्य प्रवाहातील मुस्लिम त्यांना गैर-मुस्लिम मानतात, असे बोलले जात आहे. आणखी एका अलीकडील घटनेत, TLP कट्टरपंथीयांनी अहमदिया समुदायाच्या सदस्यांना पंजाब प्रांतातील कसूर शहरातील मशिदीत प्रवेश करण्यापासून रोखले.
अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, त्यांनी अहमदिया समुदायातील लोकांचा छळ केला आणि त्यांना मारहाण केली.
वृत्तानुसार, अहमदिया मुस्लिम याबाबत पोलिसांकडेही गेले होते, मात्र याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही.
शुक्रवारी भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) अल्पसंख्याकांना धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानवर जोरदार टीका केली.
तसेच, भारताच्या प्रतिनिधी सीमा पुजानी म्हणाल्या की, 'आज पाकिस्तानमध्ये कोणताही धार्मिक अल्पसंख्याक मुक्तपणे जगू शकत नाही किंवा आपला धर्म पाळू शकत नाही. अहमदिया समाजाचा केवळ त्यांच्या श्रद्धेपोटी सरकारकडून छळ केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.