Syrup  Dainik Gomantak
ग्लोबल

Uzbekistan: गाम्बियानंतर उझबेकिस्तानमध्ये कफ सिरप प्यायल्याने 18 मुलांचा मृत्यू!

Uzbekistan News: कफ सिरप प्यायल्याने गाम्बियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.

दैनिक गोमन्तक

Uzbekistan News: कफ सिरप प्यायल्याने गाम्बियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. यातच आता, उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने आरोप केला आहे की, भारतीय औषध कंपनीने बनवलेल्या औषधाचे सेवन केल्याने देशात 18 मुलांचा मृत्यू झाला आहे. मंत्रालयाने म्हटले की, मेरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडची नोंदणी उझबेकिस्तानमध्ये 2012 मध्ये झाली होती.

उझबेकिस्तानच्या (Uzbekistan) आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, मृत्यू झालेल्या मुलांनी नोएडास्थित मेरियन बायोटेकने निर्मित डॉक-1 मॅक्स सिरपचे सेवन केले होते. डॉक-1 मॅक्स सिरप घेतल्याने श्वासोच्छवासाचा गंभीर आजार असलेल्या 21 पैकी 18 मुलांचा मृत्यू झाला आहे. मंत्रालयाने पुढे म्हटले की, असे आढळून आले आहे की, मरण पावलेल्या मुलांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यापूर्वी 2-7 दिवस हे औषध 3-4 वेळा देण्यात आले होते. यासोबतच कंपनीने औषधासाठी ठरवलेली मानके निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त आहेत.

इंडिया टुडेच्या अहवालानुसार, आरोग्य मंत्रालयाने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, औषधाचा मुख्य घटक पॅरासिटामॉल असल्याने, मुलांच्या पालकांनी ते स्वतःहून किंवा फार्मसी विक्रेत्यांच्या शिफारसीनुसार चुकीच्या पद्धतीने सर्दी-विरोधी म्हणून लिहून दिले आहे. परिस्थिती बिघडण्याचे हेच मुख्य कारण आहे.

दुसरीकडे, आरोग्य मंत्रालयाने असा दावा केला आहे की, सिरपच्या प्राथमिक चाचण्यांमध्ये असे आढळून आले आहे की, त्यात इथिलीन ग्लायकॉल आहे, जे एक विषारी द्रव्य आहे. यामुळे उलट्या होणे, बेशुद्ध होणे, हृदयाच्या समस्या आणि मूत्रपिंड निकामी होणे यासारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT