Brain Eating Amoeba: कोरोनानंतर आता मेंदूला इजा पोहोचवणाऱ्या अमिबाची दहशत ?

Brain Eating Amoeba: मेंदू खाणारा अमिबा हे सामान्य भाषेत म्हटले जाते. परंतु, याचे शास्त्रीय नाव नायग्रेलिया फॉउलरी आहे.
Brain Eating Amoeba
Brain Eating AmoebaDainik Gomantak
Published on
Updated on

Brain Eating Amoeba: कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असताना आता मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे एकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मेंदू खाणारा अमिबा हे सामान्य भाषेत म्हटले जाते. परंतु, याचे शास्त्रीय नाव नायग्रेलिया फॉउलरी आहे.

ही घटना दक्षिण कोरियामध्ये घडली आहे. केडीसीए अर्थात कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंध एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेला व्यक्ती गेले 4 महिने थायलंडमध्ये वास्तव्यास होता. 10 डिसेंबरला तो दक्षिण कोरियात परतला होता त्यानंतर त्याचा या दुर्मिळ संसर्गाने मृत्यू झाला आहे.

पहिल्यांदा हा संसर्ग 1997 ला अमेरिकेत नोंदवला गेला. अमिबा नाकाद्वारे शरिरात प्रवेश करतो आणि मेंदूपर्यत पोहोचतो. त्याचबरोबर, अमिबा आपल्या प्रतिकृती वेगाने बनवतो. केडीसीएने दिलेल्या माहितीनुसार, नायग्रेलिया फॉउलरी हा संसर्गजन्य आजार नाही. परंतु धोका टाळण्यासाठी स्थानिक रहिवाशांना हा रोग पसरलेल्या भागात जाण्यापासून परावृत्त करण्यास सांगितले.

Brain Eating Amoeba
Chhattisgarh: 23 वर्षीय सोशल मीडिया स्टारची आत्महत्या, लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

दरम्यान, अमेरिका( USA ) , भारत ( India) आणि थायलंडसह जगभरात 2018 पर्यंत नायग्रेलिया फॉउलरीचे एकूण 381 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीला नेग्लेरिया फॉउलरी लागण होते , तेव्हा सुरुवातीला डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलट्या यांसारखी लक्षणे दिसतात. अर्थात हा एक दुर्मिळ संसर्ग तरी वाढत्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण लक्षात घेता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com