अमेरिकेत कोरोनानंतर नव्या संसर्गाची दहशत

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid 19) वाढत असतानाच आता अमेरिकेत (America) नव्या व्हायरसने डोक वर काढलं आहे.
Candida Auris
Candida AurisDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid 19) वाढत असतानाच आता अमेरिकेत (America) नव्या व्हायरसने डोक वर काढलं आहे. अमेरिकी हेल्थ ऑफिसर्स ने डलास क्षेत्रामधील रुग्णालयात आणि वॉशिग्टंन डिसीमधील नर्सिंग होममध्ये अनट्रिटेबल फंगस कैंडिडा ऑरिस (Candida Auris) यीस्टचा धोकादायक प्रकार आढळला आहे. आणि नर्सिंग होम आणि वैद्यकीय समस्या असलेल्या रूग्णालयातील रुग्णांसाठी हा एक मोठा धोका आहे. वास्तविक या बुरशीमुळे रक्तप्रवाहामध्ये संसर्ग होऊ शकतो. यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.

सीडीसीचे मेघन रायन म्हणाले की, ते प्रथमच 'प्रतिकारांचा समूह' पहात आहेत ज्यात रूग्ण एकमेकांपासून संक्रमित होत आहेत. वॉशिंग्टन डीसी नर्सिंग होममध्ये आढळलेल्या 101 कैंडिडा ऑरिसच्या गटात अशी तीन प्रकरणे आढळली जी तीनही प्रकारच्या अँटीफंगल औषधांना प्रतिसाद देत नाहीत. डॅल्लास क्षेत्रातील दोन रूग्णालयात 22कैंडिडा ऑरिस क्लस्टरची नोंद झाली आहे. यातील दोन प्रकरणे मल्टीड्रॅग प्रतिरोधक असल्याचे आढळले आहेत, त्यानंतर सीडीसीने असा निष्कर्ष काढला आहे की संसर्ग रूग्णांकडून ते रूग्णांपर्यंत संक्रमित होत आहेत जे की, 2019 च्या उलट आहे, वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला की न्यूयॉर्कमधील उपचारादरम्यान तीन रुग्णांनामध्ये औषधाचा प्रतिकार करण्याची क्षमता झाली होती.

Candida Auris
दुसऱ्या महायुध्दातील बेपत्ता सैनिकांच्या अवशेषांचा अमेरिका गांधीनगरमध्ये घेणार शोध

तीनपैकी एकाचा मृत्यू होतो

यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशनच्या मते, धोकादायक कॅंडीडा ऑरिस संसर्ग झालेल्या तीनपैकी एकाचा मृत्यू होतो. यूएस हेल्थ एजन्सीने वाढत्या प्रादुर्भावपूर्ण बुरशीचा जागतिक आरोग्यास धोका असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. सीडीसीही या बुरशीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कारण मल्टीड्रग्जचा त्यावर कोणताही परिणाम होत नाही. याचा अर्थ असा आहे की ते संसर्गांच्या उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या बर्‍याच अँटीफंगल औषधांना प्रतिरोधक आहे, तसेच, मानक प्रयोगशाळेच्या पद्धतींचा वापर करून संसर्ग ओळखणे कठीण आहे कारण चुकीच्या निदानामुळे चुकीच्या उपचारांचा धोका असतो.

Candida Auris
Coronavirus in India: कोरोनाशी लढा देण्यास अमेरिका भारताला मदत करत राहणार

संक्रमण कसे ओळखावे

गंभीर कॅन्डिडा इन्फेक्शन झालेल्या बहुतेक रुग्ण आधीच कोणत्या कोणत्या आजाराने ग्रस्त आहेत. म्हणूनच एखाद्यास कॅन्डिडाला संसर्ग झाला आहे की नाही हे माहिती करणे जास्त कठिण जात आहे. सीडीसीच्या मते ताप आणि सर्दी ही कॅन्डिडा संसर्गाची सर्वात सामान्य लक्षणे आहेत आणि संसर्गासाठी अँटीबायोटिक उपचार असूनही लक्षणे सुधारत नाहीत. सध्या, शास्त्रज्ञ एन्टीफंगल औषधांना कॅन्डिडा ऑरिस संसर्ग प्रतिरोधक का आहे हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासह, अलिकडच्या वर्षांत हे संक्रमण इतके आक्रमक का झाले आहे हे देखील शोधले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com