African King Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: 15 बायका, 30 मुलं आणि 100 सेवक! राजा 'मस्वाती' शाही लवाजम्यासह अबू धाबी विमानतळावर दाखल; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

African King Viral Video: आफ्रिकी-अमेरिकन व्यक्ती महिलांच्या मोठ्या समूहासह खासगी जेटमधून खाली उतरताना दिसत आहे.

Manish Jadhav

African King Viral Video: दक्षिण आफ्रिकेतील इस्वातिनी (Eswatini) देशाचे राजा मस्वाती तृतीय (King Mswati III) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राजा मस्वाती त्यांच्या खासगी जेटने (Private Jet) अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतानाचा हा व्हिडिओ असून त्यांच्या कुटुंबाची मोठी संख्या आणि शाही लक्झरी लाइफस्टाइल पाहून जगभरातील लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

10 जुलै 2025 रोजीचा हा व्हिडिओ (Video) असल्याचे सांगितले जात आहे, ज्यात एक आफ्रिकी-अमेरिकन व्यक्ती महिलांच्या मोठ्या समूहासह खासगी जेटमधून खाली उतरताना दिसत आहे. या व्यक्तीच्या आजूबाजूला असलेले लोक वाकून त्याला सलाम करत असल्याचे पाहून विमानतळावरील लोकही चकित झाले. हा खासगी जेटमधून उतरणारा व्यक्ती दुसरे कोणी नसून इस्वातिनीचे राजे मस्वाती तृतीय असल्याचा दावा केला जात आहे.

राजा मस्वाती तृतीय हे त्यांच्या 15 पत्नी, 30 मुले आणि सुमारे 100 सेवकांच्या (Servants) मोठ्या ताफ्यासह (Entourage) अबू धाबी येथे दाखल झाले. त्यांच्या कुटुंबाची संख्या इतकी मोठी होती की, विमानतळावर असलेली सुरक्षा व्यवस्था (Security) अपुरी पडली. परिणामी, वाढलेली गर्दी आणि सुरक्षा व्यवस्थापनासाठी अधिकाऱ्यांना विमानतळाचे तीन टर्मिनल बंद करुन तात्पुरते 'लॉकडाउन' (Temporary Lockdown) करावे लागले.

राजा मस्वाती यांचा यूएई दौरा आर्थिक करारांवर वाटाघाटी करण्याच्या उद्देशाने होता, परंतु त्यांच्या आलिशान लाइफस्टाइलमुळे त्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले. fun_factorss नावाच्या इंस्टाग्राम हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये राजा मस्वाती हे पारंपारिक बिबट्याचे प्रिंट असलेल्या वेशभूषेत दिसत आहेत, तर त्यांच्या पत्नी आकर्षक रंगीत आफ्रिकन वेशभूषेत आहेत. त्यांच्या 100 सेवकांचा मोठा चमू राजेशाही सामान आणि इतर व्यवस्थापन हाताळण्यात व्यस्त होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी मिम्स (Memes) तयार केले आहेत, ज्यात यूजर्स राजाच्या कुटुंबाची तुलना एका संपूर्ण गावाशी करत आहेत.

राजाचे कुटुंब आणि प्रचंड संपत्ती

राजा मस्वाती यांचे वडील स्वाझीलँडचे राजे होते. त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, त्यांच्या 70 हून अधिक, तर काही अहवालांनुसार तब्बल 125 पत्नी आणि 210 हून अधिक मुले होती.

सध्याचे राजा मस्वाती तृतीय यांची स्वतःची 30 पत्नी आहेत. तसेच त्यांना 35 हून अधिक मुले आहेत. त्यांनी 1986 पासून ते इस्वातिनीचे राजे असून जगातील सर्वात श्रीमंत सम्राटांपैकी एक मानले जातात. त्यांची अंदाजित एकूण संपत्ती 1 अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. मात्र त्यांच्या या राजेशाही दौऱ्यामुळे सोशल मीडियावर (Social Media) चर्चांना उधाण आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Car Accident: नियंत्रण सुटलं अन् कार नदीत कोसळली... चालकाची जीव वाचवण्यासाठी धडपड, सुदैवाने बचावला; डिचोलीतील घटना

खांद्यावर हात, जबरदस्तीनं सेल्फी! हरमल बीचवर विदेशी महिला पर्यटकांसोबत तरूणांकडून गैरवर्तन, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

WC Prize Money: बक्षिसांचा महापूर! विश्वविजेत्या भारताला मिळालेली रक्कम पाहून व्हाल थक्क, उपविजेत्या आफ्रिकेला किती कोटी मिळाले? पाहा संपूर्ण यादी

मडगांवा भिरांकूळ अपघात; एकल्याक मरण Watch Video

Ponda By- Election: आम्ही चालवू पुढे 'बाबां'चा वारसा! रितेशनी घेतला रवींच्या कार्यालयाचा ताबा, उमेदवारीबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य

SCROLL FOR NEXT