Taliban fighters sit on a vehicle along the street in Jalalabad province AFP
ग्लोबल

Afghanistan-Taliban turmoil: 20 वर्षांपूर्वीच्या तालिबानी राजवटीची दहशत; काय आहे शरिया कायदा?

संपूर्ण जग शांतपणे पाहत राहिले आणि अफगाणिस्तान पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात गेला.

दैनिक गोमन्तक

युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील (Afghanistan) महत्त्वाची शहरे काबीज करीत तालिबान (Taliban) अतिरेक्यांनी रविवारी रात्री उशिरा हळूहळू राजधानी काबूलमध्ये (Kabul) कब्जा मिळवला. अतिरेक्यांनी शहरातील सर्व बाॅर्डर क्राॅसिंगवर कब्जा केला. आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी यांनी देश सोडला. तालिबानने राजधानी काबूल ताब्यात घेतल्याने संपूर्ण अफगाणिस्तानच्या सत्तेवर तालिबानचे नियंत्रण निश्चित झाले आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी आणि त्यांच्या नेतृत्वातील वरिष्ठ नेते आणि अधिकारी देश सोडून गेले आहेत. तालिबान लढाऊंनी काबूलमधील प्रमुख ठिकाणे ताब्यात घेणे सुरू केले आहे. आता जग 20 वर्षांपूर्वी तालिबानच्या रानटी राजवटीची आठवण करून अफगाणिस्तान वाचवा अशा घोषणा देत आहे. तेव्हा , हे तालिबानी लोक कोण आहेत आणि त्याची एवढी का दहशत आहे?

संपूर्ण जग शांतपणे पाहत राहिले आणि अफगाणिस्तान पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात गेला. 15 ऑगस्ट 2021 च्या सकाळी, जेव्हा लोक भारतात स्वातंत्र्यदिन साजरा करत होते तेव्हा तालिबान लढाऊ अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर घेराव घालत होते. अफगाण नागरिकांच्या स्वातंत्र्यावर कब्जा करत होते. गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या लढाईत, कंधार, हेरात, कुंडूज, जलालाबाद, बल्ख आणि उर्वरित अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात येत होता, पण राजधानी काबूल इतक्या लवकर ढवळून निघणार या अंदाज कुणीली नव्हता. रविवारी सकाळी तालिबानच्या माणसांनी अचानक काबूलला वेढा घातला आणि अफगाणिस्तान सरकार आणि सैन्य आत्मसमर्पण करताना दिसले. या दरम्यान, काबूलहून अमेरिकन नागरिकांना घाईघाईने घेऊन जाणाऱ्या घिरट्या घालणाऱ्या हेलिकॉप्टरचे चित्रही संपूर्ण जगाने पाहिले.

मशीन गन आणि रॉकेट लाँचरसह सशस्त्र तालिबान लढाऊंनी काबुल शहराला वेढा घातला. तालिबानने बाग्राम एअरबेस, बाग्राम जेल, काबुल शहराचे प्रवेशद्वार आणि परिसरातील अनेक महत्त्वाच्या इमारती ताब्यात घेतल्या आणि तालिबान लढाऊंनी एक एक करून संध्याकाळपर्यंत अफगाणिस्तान काबीज केले. तालिबानने लष्कर आणि नागरिकांना सुरक्षेचे आश्वासन दिले असले तरी कोणालाही प्रत्युत्तर दिले जाणार नाही, परंतु या दरम्यान काबूल सोडून जाण्याची लोकांची ओढ वाढत होती. शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी दिसून आली. नागरिकांनी तालिबानी राजवटीखाली राहण्याऐवजी शहरातून पळून जाणे योग्य समजले.

काबूलहून धावणाऱ्या गाड्या ताजिकिस्तान, इराण आणि इतर शेजारील देशांच्या सीमेच्या दिशेने मोठ्या संख्येने धावताना दिसल्या. ज्या लोकांनी 20 वर्षांपूर्वी तालिबानचे रानटी रूप आणि मध्ययुगीन राज्य पाहिले ते नागरिक कोठेही आश्रय शोधतांना दिसत आहे.

अफगाणिस्तानचे संकट कसे सुरू झाले?

इतिहासात क्वचितच काही देशाच्या भूमीने असे चढउतार पाहिले असावेत. रशियाच्या पाठीशी असलेल्या झहीर शाहच्या राजवटीत एकेकाळी आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या अफगाणिस्तानने 1990 च्या दशकात तालिबानचे मध्ययुगीन शासनही पाहिले आहे. यानंतर, 9/11 च्या हल्ल्यानंतर, अमेरिकन आणि नाटो देश तालिबानच्या राजवटीतून मुक्त झाले आणि वीस वर्षांत हा देश आपल्या पायावर उभा राहायला शिकत होता की तालिबानने पुन्हा डोके वर काढले. एप्रिल 2021 मध्ये अमेरिकेने घोषणा केली की सप्टेंबर पर्यंत आपले सैन्य परत येईल, त्यानंतर तालिबानने आपला हल्ला तीव्र केला आणि आज परिस्थीती सर्वांसमोर आहे.

जिथे जिथे तालिबान्यांनी ताबा मिळवला तिथे समान शरिया कायदा, चाबकाची शिक्षा, रस्त्यावर कत्तल करणे, दाढी वाढवणे, संगीत ऐकणे आणि स्त्रियांवर निर्बंध लादणे अशे नियम लागू झाल्याने आता अफगान पुन्हा मध्ययुगीन फर्मानाच्या युगात परतला. संपूर्ण देश आता पुन्हा तालिबानच्या नियंत्रणाखाली आला आहे. आणि लोकांना भीतीपोटी पुन्हा आपली घरे सोडून शेजारच्या देशांमध्ये पळून जाण्यास भाग पाडले जात आहे.

कोण आहे तालिबान? का आहे त्याची दहशत?

अफगाणिस्तानातून रशियन सैन्याच्या माघारीनंतर 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला उत्तर पाकिस्तानात तालिबानचा उदय झाला. पश्तो भाषेतील तालिबानचा अर्थ 'इस्लामिक धार्मिक शिकवणींनी प्रेरित झालेले विद्यार्थी'असा आहे. असे म्हटले जाते की कट्टरपंथी सुन्नी इस्लामिक विद्वानांनी पाकिस्तानमध्ये धार्मिक संस्थांच्या मदतीने आपला पाया रचला होता. तालिबानवर देववंदी विचारसरणीचा पूर्ण प्रभाव आहे. सौदी अरेबियाकडून येणारी आर्थिक मदत तालिबानला उभे करण्यासाठी जबाबदार मानली जात होती. सुरुवातीला, तालिबानने घोषित केले की त्यांचा हेतू इस्लामिक भागातून परकीय शासन संपवणे हा आहे, शरिया कायदा आणि इस्लामिक राज्य स्थापन करणे हा आहे. पण तोपर्यंत तालीबान एवढा पावरफूल झाला की, त्यातून सुटका होण्याच्या आशाच संपून गेल्या.

Head of the Taliban delegation Abdul Salam Hanafi (R), accompanied by Taliban officials (2R to L) Amir Khan Muttaqi, Shahabuddin Delawar and Abdul Latif Mansour

रशिया-अमेरिका शीतयुद्धाचा बळी!

सुरुवातीला अफगाणिस्तानात रशियाचा प्रभाव संपवण्यासाठी तालिबानच्या मागे अमेरिकेचे समर्थन असल्याचे मानले जात होते, पण 9/11 च्या हल्ल्यामुळे अमेरिकेला कट्टरपंथी विचारसरणीचा ताप जाणवला आणि तो स्वतःच त्याविरोधात युद्धात उतरला. पण काबूल-कंधार सारख्या मोठ्या शहरांनंतर, डोंगराळ आणि आदिवासी भागातून तालिबान्यांचा खात्मा करण्यात अमेरिकन आणि मित्र देशांना गेल्या 20 वर्षात यश आले नाही. विशेषतः पाकिस्तानला लागून असलेल्या भागात, तालिबानला पाकिस्तानी पाठिंबा मिळत राहिला आणि आज अमेरिकन सैन्याच्या माघारीने तालिबानने पुन्हा डोके वर काढले आणि संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला.

तालिबानचा नेता कोण आहे?

तालिबान ही कट्टर धार्मिक विचारांनी प्रेरित आदिवासी लढवय्यांची संघटना आहे. त्याचे बहुतेक लढाऊ आणि कमांडर मौलवी आणि कबाइली गटांचे प्रमुख आहेत, जे पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमावर्ती भागातील कट्टर धार्मिक संघटनांमध्ये शिकलेले आहेत. त्यांचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे पाश्चिमात्य देशांचा प्रभाव राजवटीतून काढून टाकणे आणि देशात इस्लामिक शरिया कायदा प्रस्थापित करणे. अमेरिकन ड्रोन हल्ल्यात पहिले मुल्ला उमर आणि नंतर मुल्ला मुख्तर मंसूर चा 2016 मध्ये मृत्यू झाल्यापासून तालीबानचा मौलवी हिब्तुल्लाह अखुंजादा प्रमुख आहेत. तो तालिबानच्या राजकीय, धार्मिक आणि लष्करी बाबींचे सर्वोच्च कमांडर आहेत. हिबतोल्ला अखुंजादा कंधारमध्ये एक सेमिनरी चालवत होता आणि तालिबानच्या युद्ध कारवायांच्या बाजूने फतवे जारी करत होता. 2001 पूर्वी अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीत तो न्यायालयांचा प्रमुख होता. 1994 मध्ये स्थापन झालेल्या तालिबानच्या चार संस्थापक सदस्यांपैकी हा एक होता आणि तो संस्थापक मुल्ला उमरचा सहकारी होता. त्याने अनेक लढाईंचे नेतृत्व केले आहे.

जग मूक प्रेक्षक म्हणून पाहत राहिले!

तालिबानची मुख्य ताकद कट्टर धार्मिक संस्था, सेमिनरी आहे जे त्यांच्या कल्पनेला समर्थन देत आहेत. इथेच तालिबानी लढाऊ तयार होत आहेत. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानी लष्कर आणि ISI ची गुप्त मदत तालिबानसाठी उपयुक्त ठरली आहे. अफगाणिस्तानबाबत आंतरराष्ट्रीय भूमिकाही गोंधळलेली आहे. अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या सैन्याने माघार घेण्याच्या घोषणेने अफगाणिस्तान ताटात जेवण द्याव असं तालिबानसमोर सादर केलं. रशिया तालिबान बद्दल फार स्पष्ट नाही. अमेरिकेचे वर्चस्व संपवण्यासाठी तालिबानच्या उदयाने रशिया खुश आहे, तर तालिबानला शेजारच्या ताजिकिस्तान-उझबेकिस्तान सारख्या रशियन प्रभाव असलेल्या देशांसाठी हा धोक्याची घंटाच आहे. तालिबानच्या पाठीमागे पाकिस्तान आहे आणि अशा परिस्थितीत तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानात प्रभाव वाढण्याची शक्यता चीनलाही दिसते.

डिप्लोमॅट सुरक्षित परत आणणे भारतासमोर मोठे आव्हान

भारतातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे. भारताने गेल्या 20 वर्षांत अफगाणिस्तानच्या विकासात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली होती. भारताने शाळा, रुग्णालये, वीज-वायू संयंत्रांसह अनेक मोठ्या प्रकल्पांवर बराच खर्च केला, परंतु आता हे सर्व तालिबानी राजवटीच्या आगमनाने संपुष्टात आले आहे. एअर इंडियाच्या अनेक विमानांनी भारतीयांना घरी आणले जात आहे. राजनैतिक अधिकाऱ्यांना सुरक्षित परत आणणे हे एक मोठे आव्हान आहे. पूर्वीच्या तालिबान राजवटीत कंधार विमान अपघाताचा थरार भारताने भोगला आहे.

तालीबानी कार्यपद्धतीत काही बदल होईल का?

जग बघत राहिले आणि तालिबान्यांनी शस्त्रांच्या जोरावर अफगाणिस्तानवर कब्जा केला. अफगाणिस्तानातील 3 कोटी 84 लाख लोकांचे स्वातंत्र्य, मानवी हक्कांचे प्रश्न या सर्वांनी तालीबानपुढे शरणागती पत्करली. आता येत्या काळात तालिबान पुन्हा 20 वर्ष जुने रानटीपणाचे राज्य दाखवेल का? बदललेल्या काळात त्याच्या कार्यपद्धतीत काही बदल होईल का? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT