Nangarhar province Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan: नांगरहारमधील मशिदीत भीषण स्फोट; 3 ठार, 12 जखमी

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) अशांत नांगरहार प्रांतातील मशिदीत शुक्रवारी झालेल्या स्फोटात अनेक अफगाण नागरीक ठार झाले असल्याचे तालिबानी अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) पूर्वेकडील नांगरहार प्रांतातील (Nangarhar province) स्पिन घर परिसरात शुक्रवारच्या नमाजादरम्यान मशिदीमध्ये मोठा स्फोट (Blast in Nangarhar province) झाला. या स्फोटात स्थानिक मौलवीसह 12 जण जखमी झाले आहेत. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी माहिती दिली आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे 1.30 वाजता हा स्फोट झाला असल्याचे परिसरातील एका अफगाण नागरिकाने सांगितले. दरम्यान मशिदीमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला असल्याची माहिती आणखी एका रहिवाशाने दिली. त्याचवेळी तालिबानी अधिकाऱ्याने एएफपी या वृत्तसंस्थेला या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानच्या अशांत नांगरहार प्रांतातील मशिदीत शुक्रवारी झालेल्या स्फोटात अनेक अफगाण नागरीक ठार झाले असल्याचे तालिबानी अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान अधिकाऱ्याने सांगितले की, स्पिन घर जिल्ह्यातील (Spin Ghar district) मशिदीत शुक्रवारी नमाजादरम्यान झालेल्या स्फोटाची पुष्टी करण्यात आली आहे. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांत अफगाणिस्तानमध्ये अनेक हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमागे इस्लामिक स्टेटचा (Islamic State) हात असल्याचे सांगितले जात आहे.

काबूल रुग्णालयाबाहेर स्फोट

तत्पूर्वी, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील लष्करी रुग्णालयासमोर मंगळवारी नागरिकांना लक्ष्य करुन बॉम्बस्फोट घडवण्यात आला. तालिबानचे उप प्रवक्ते बिलाल करीमी यांनी असोसिएटेड प्रेस (एपी) ला सांगितले की, काबुलमधील सरदार मोहम्मद दाऊद खान मिलिटरी हॉस्पिटलच्या बाहेर नागरिकांना लक्ष्य करत स्फोट घडवून आणण्यात आला. या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू झाला, तर 50 जण जखमी झाले. सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर हा स्फोट झाला. इस्लामिक स्टेटच्या सैनिकांनी रुग्णालयाबाहेरही गोळीबार केला.

ऑक्टोबरमध्ये शिया मशिदीत स्फोट

उत्तर अफगाणिस्तानमधील शिया मुस्लिम उपासकांनी भरलेल्या मशिदीत 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या स्फोटात किमान 46 लोक ठार अन् अनेकजण जखमी झाले. इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी गटाने मशिदीवरील बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून त्यांच्या आत्मघाती हल्लेखोराने ही घटना घडवून आणल्याचे सांगितले जात आहे. कुंदुझ प्रांतातील मशिदीत दुपारच्या प्रार्थनेदरम्यान स्फोट झाल्याच्या काही तासांनंतर आयएसशी संलग्न असलेल्या अमाक वृत्तसंस्थेने हा दावा केला आहे. या दाव्यात, आयएसने आत्मघाती बॉम्बरची ओळख उइघुर मुस्लिम म्हणून करण्यात आली आहे. तसेच हा हल्ला शिया आणि तालिबान्यांना लक्ष्य करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

Omkar Elephant: 'ओंकार'चा उगवे भागात धुमाकूळ, संतप्त नागरिकांकडून सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Cavelossim Assolna bridge: केळशी-असोळणा पुलाची धोकादायक फट बुजवली, वॉरन यांनी वेधले लक्ष; 4 तासांत रस्‍त्‍याची दुरुस्‍ती

SCROLL FOR NEXT