अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर तालिबानने अंतरिम सरकारची (Taliban Government) घोषणा केली. त्याच वेळी, तालिबान (Taliban) आता आपल्या सैनिकांना सरकारमधील महत्वाची पदे वितरीत करु लागला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, तालिबानने आपल्या 44 सदस्यांना प्रांतीय गव्हर्नर (Governors) आणि पोलिस प्रमुख यासारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केले आहे. देशातील शासन व्यवस्था बळकट व्हावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे सांगण्यात आहे. तालिबानच्या ताब्यात आल्यापासून युद्धग्रस्त अफगाणिस्तान सुरक्षा आणि आर्थिक आव्हानांना (Afghanistan Economy Cirsis) तोंड देत आहे.
दरम्यान, सप्टेंबरमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर तालिबानची ही पहिलीच मोठ्या प्रमाणावर सरकारी नियुक्त्या करु लागला आहे. तालिबानने जारी केलेल्या यादीनुसार, कारी बरयाल (Qari Baryal) यांची काबूलच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर वली जान हमजा (Wali Jan Hamza) शहराचे पोलीस प्रमुख म्हणून काम पाहतील. हमजाच्या आधी या पदावर असलेले मौलवी हमदुल्ला मुखलिस (Maulvi Hamdulla Mukhlis) हे गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानातील सर्वात मोठ्या लष्करी रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात ठार झाले होते. या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानात परकीय चलनाच्या वापरावर बंदी
तालिबानच्या ताब्यात आल्यापासून अफगाणिस्तानात सातत्याने स्फोट होत आहेत. यावरुन तालिबानने ताबा मिळवल्यानंतर युद्धग्रस्त देशात शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्याचे दिलेले आश्वासन पोकळ असल्याचे स्पष्ट होत आहे. देशातील सुरक्षा परिस्थितीमुळे दहशतवादी गटांचे आश्रयस्थान बनण्याच्या संभाव्यतेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट रोजी तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून देशाची अर्थव्यवस्थाही कोलमडून पडली आहे. अलीकडेच तालिबाननेही अफगाणिस्तानात परकीय चलनाच्या वापरावर बंदी घातली आहे. तसेच तालिबान्यांनी फतवा काढत म्हटले आहे की, सर्व अफगाण नागरिकांनी व्यापारासाठी अफगाण रुपयाचा वापर करावा.
परदेशातील अफागनिस्तानची संपत्ती गोठवण्यात आली
नियम मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असा इशारा अतिरेकी संघटनेने दिला आहे. याआधी अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन डॉलरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत होता. मात्र, या माध्यमातून सीमावर्ती भागातच व्यापार होत होता. तालिबान सत्तेवर आल्यानंतर, यूएस फेडरल रिझर्व्ह आणि युरोपमधील केंद्रीय बँकांनी देशाची परदेशी मालमत्ता गोठवली. अमेरिकेचे डेप्युटी ट्रेझरी सेक्रेटरी वॅली अडेमो यांनी सांगितले की, तालिबानविरोधातील निर्बंध कायम ठेवणे महत्त्वाचे आहे, असे आमचे मत आहे. पण त्याच वेळी अफगाण लोकांना कायदेशीर मानवतावादी मदत मिळवण्याचे नवे मार्गही शोधा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.