Kabul Dainik Gomantak
ग्लोबल

Kabul मधील मशिदीजवळ बॉम्बस्फोट, 8 ठार 18 जखमी; IS ने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

Kabul Attack: अफगाणिस्तानातील काबूल येथील मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात आठ जण ठार तर 18 जण जखमी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Afghanistan: अफगाणिस्तानातील काबूल येथील मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात आठ जण ठार तर 18 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मशिदीजवळ उभ्या असलेल्या वाहनात स्फोट झाला. तालिबानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, काबूलच्या (Kabul) पोलीस प्रमुखाचे तालिबान-नियुक्त प्रवक्ते खालिद झदरान यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम काबूलमधील शियाबहुल सार-ए कारेझ भागात बॉम्बस्फोट झाला. सुरुवातीच्या अहवालात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती, मात्र नंतर काही जखमींचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा वाढला.

या हल्ल्याची जबाबदारी आयएसने घेतली आहे

इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जिथे पोलीस मृतांचा आकडा 8 सांगत आहेत. त्याचवेळी या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा आयएसने केला आहे. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये स्फोटानंतर लोक मदतीसाठी ओरडताना दिसत आहेत.

IS हा अफगाणिस्तानसाठी मोठा धोका

आयएसशी संबंधित दहशतवादी 2014 पासून अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सक्रिय आहेत, ज्यांना देशाच्या सुरक्षेसाठी मुख्य धोका म्हणून पाहिले जाते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर हे हल्ले अधिक वाढले. या कट्टरपंथी दहशतवादी गटाने अलीकडच्या काही दिवसांत अफगाणिस्तानमध्ये झालेल्या अनेक हल्ल्यांमागे प्रामुख्याने अल्पसंख्याक शिया समुदायाला लक्ष्य केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT