Flood In Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

Flood In Afghanistan: अफगाणिस्तानात भीषण पुराचा कहर, 33 ठार, 27 जखमी... येत्या दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होणार

Flood In Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Manish Jadhav

Flood In Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसानंतर आलेल्या पुरात 33 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. तालिबानचे प्रवक्ते अब्दुल्ला जनान सॅक यांनी सांगितले की, राजधानी काबूल आणि अनेक प्रांतांमध्ये अचानक पूर आला आणि त्यामुळे मोठे नुकसान झाले.

पावसाने कहर केला

अब्दुल्ला जनान यांनी पुढे सांगितले की, पुरामुळे 600 हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली. त्याचबरोबर सुमारे 200 गुरे दगावली. पुरामुळे 800 हेक्टर शेतजमीनही उद्ध्वस्त झाली असून 85 किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे नुकसान झाले आहे. जनान यांनी पुढे असेही सांगितले की, पुरामुळे पश्चिम फराह, हेरात, दक्षिणी झाबुल आणि कंदाहार प्रांतात सर्वाधिक नुकसान झाले आहे. सध्या अफगाणिस्तानात पावसापासून दिलासा मिळण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. येत्या काही दिवसांत अफगाणिस्तानातील 34 पैकी बहुतांश प्रांतांमध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खराब होत आहे

याआधीही अफगाणिस्तानातील नैसर्गिक आपत्तीत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये पूर्व अफगाणिस्तानात प्रचंड हिमवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात 25 जणांचा मृत्यू झाला होता. तर मार्चमधील तीन आठवड्यांच्या पावसात सुमारे 60 जणांचा मृत्यू झाला होता. संयुक्त राष्ट्राने गेल्या वर्षी असा इशारा दिला होता की, अफगाणिस्तानमध्ये हवामानात मोठे बदल होत आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानाचे स्वरुप बिघडत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT