Kabul Blast Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan: काबूलमध्ये भीषण स्फोट, 32 ठार; 40 जण जखमी

Blast In Kabul: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज (शुक्रवारी) सकाळी मोठा स्फोट झाला असून त्यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Blast In Kabul: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज (शुक्रवारी) सकाळी मोठा स्फोट झाला असून त्यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी या बॉम्बस्फोटात 40 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तालिबानचे प्रवक्ते खालिद झदरान यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी दश्ती बर्ची भागात हा स्फोट झाला. अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक शिया समुदायाचे बहुतांश लोक या भागात राहतात. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही.

स्फोटात विद्यार्थी ठार

तालिबानचे (Taliban) प्रवक्ते खालिद झदरन यांनी सांगितले की, 'पीडितांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी आहेत, जेव्हा स्फोट झाला तेव्हा विद्यार्थी (Students) विद्यापीठात प्रवेश परीक्षा देत होते.' ज्या शैक्षणिक केंद्रांना लक्ष्य केले जात आहे, त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

फिदाईनने शैक्षणिक केंद्राला लक्ष्य केले

अफगाण पीस वॉच या स्वयंसेवी संस्थेने ट्विटर पोस्टमध्ये म्हटले की, 'एका आत्मघाती हल्लेखोराने विद्यार्थ्यांमध्ये स्फोट घडवून आणला. काज शैक्षणिक केंद्राला लक्ष्य करण्यात आले. नुकतेच काबूलमधील (Kabul) वजीर अकबर खान परिसरात बॉम्बस्फोट झाला होता.'

त्याच वेळी, अफगाणिस्तानच्या (Afghanistan) गृह मंत्रालयात तालिबान-नियुक्त प्रवक्ते अब्दुल नफी तकोर यांनी सांगितले की, शुक्रवारी पहाटे स्फोट झाला. आमचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT