World's Best Lovers in Scotland  Dainik Gomantak
ग्लोबल

जोडप्यांच एकमेकांवर अफाट प्रेम; 'हा' जगातील रोमँटिक देश

एका सर्वेक्षणात स्कॉटलंडमधील लोकांना जगातील सर्वोत्तम लवर मानले गेले आहे.

दैनिक गोमन्तक

एका सर्वेक्षणात स्कॉटलंडमधील (Scotland) लोकांना जगातील सर्वोत्तम लवर मानले गेले आहे, तर सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ब्रिटनमधील (Britain) 2,000 लोकांनी कबूल केले की रोमँटिक सुट्टीवर जाणाऱ्यांमध्ये स्कॉटिश लोक जगातील सर्वोत्तम लव्हर्स आहेत. अभ्यासानुसार, स्कॉटलंडच्या लोकांनी या बाबतीत चक्क ब्रिटिश, वेल्श आणि आयरिश लोकांना फ्रेंच आणि अमेरिकन (America) लोकांना मागे टाकले. यामुळेच आता प्रत्येक मुलीला तिचा होणारा नवरा किंवा बायफ्रेंड हा स्कॉटिश असावा अशी इच्छा नक्कीच निर्माण होणार. (According to a survey people in Scotland are considered the best lovers in the world)

स्कॉटलंडने अमेरिकेलाही मागे टाकले,

या सर्वेक्षणासाठी एक खास प्रश्न मंजुषा देखील तयार करण्यात आली होती. सहभागींना 1 ते 10 च्या स्केलवर त्यांच्या सुट्टीच्या फ्लिंग्सचे रेट करण्यास सांगितले होते. काही देशांनी 7 आणि 10 च्या दरम्यान स्कोअर करून टॉप 10 च्या यादीत आपले स्थान मिळवले. तर यामध्ये स्कॉटलंडने 43 टक्के गुण मिळवून अव्वल स्थान मिळविले आहे. तर वेल्सने 30 टक्के गुणांसह शेवटचे स्थान पटकावले आहे.

स्कॉटलंडनंतर यामध्ये इटली 41 टक्के, तिसऱ्या क्रमांकावर फ्रान्स 38 टक्के, इंग्लंड 37 टक्के, स्पेन35 टक्के, सहाव्या स्थानावर अमेरिका 34 टक्के, पोर्तुगाल 32 टक्के, आठव्या स्थानावर आयर्लंड 31 टक्के, स्वीडन 31 टक्के आणि शेवटी 10व्या स्थानावर वेल्स 30 टक्केंवर आहे.

वाचा डेरेक सिम्पसन काय म्हणाले…

41 वर्षीय डेरेक सिम्पसन या सर्वेक्षणात सांगतात की, लव्हिट कोव्हरिट नावाच्या कंपनीने केलेल्या या सर्वेक्षणाच्या आकड्यांमध्ये त्यांना काहीही विशेष वाटत नाहीये. कारण स्कॉटिश लोक त्यांच्या जोडीदाराला इंम्प्रेस करण्यासाठी माहिरच आहेत. सर्वेक्षण करणार्‍या कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, हॉलिडे फ्लिंग्सची संस्कृती खास फिरण्यासाठी आणि खानपानसाठी प्रसिध्द आहे, आजकतने यासंदर्भात सविस्तर रिपोर्ट दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT