एकटेपणात शांतता शोधणाऱ्या व्यक्तीसाठी स्वप्नातील घर फक्त $339,000 भारतीय चलनात अंदाजे 2.5 कोटी मध्ये विक्री चालू आहे आणि "जगातील सर्वात एकाकी घर" म्हणून त्याला नाव देण्यात आले आहे. (Want loneliness Lonely house in the world auction)
युनायटेड स्टेट्समधील (United States) मेनच्या किनार्याजवळ, अकाडिया नॅशनल पार्क आणि कॅनडाच्या सीमेदरम्यान वसलेल्या एका बेटावर डक लेजेस आयलंड नावाचे हे एक छोटे घर आहे. घर पूर्णपणे वेगळे आहे, परंतु समुद्राचे चित्तथरारक दृश्य तिथून दिसत आहे.
हे 2009 मध्ये 1.5 एकर जागेवर बांधले आहे, तर फक्त 540 चौरस फूट एक बेडरूम आणि एक लहान स्वयंपाकघर त्यामध्ये आहे. अतुलनीय सागरी दृश्यांसह, घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला कधीही रहदारीच्या आवाजाची किंवा अति-मैत्रीपूर्ण शेजाऱ्यांच्या किलबिलाटाची काळजी करण्याची गरज नाहीये. तथापि, हे बेट सीलांनी भरलेले आहे. आतील जागा जास्तीत जास्त वाढविण्यासाठी, बाथरूम एका आउटहाऊसमध्ये उभारण्यात आले आहे.
"बेटाच्या सभोवतालच्या कड्या सतत सीलने भरलेल्या आहेत, त्यात झाडे नसल्यामुळे, ते निसर्गाचे दृश्य पुर्ण पणे दाखवून देते जे तुम्हाला इतर कोठेही मिळणार नाही," असे प्रॉपर्टी सर्व्हिस म्हणजेच ज्याने हे घर खरेदी केले त्यांचे म्हणणे आहे.
“आपल्याकडे दोन्ही वेळ असताना म्हणचेज बेटाची वेळ आणि एकट्याची वेळ यापैकी कोणता निवडाल? ! हे मेन कॉटेज जेथे सील फक्त तुमचे शेजारी आहेत,"
घर चांगले बांधलेले आहे आणि समुद्रकिनाऱ्यापासून फक्त काही मीटर अंतरावर आहे तर निसर्गाने भरलेले दृश्य तुम्हाला कोठेही सापडणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.