Russia Plane Crash Dainik Gomantak
ग्लोबल

Russian Plane Crash: चीन सीमेवर 'अहमदाबाद'सारखा अपघात, रशियन विमान कोसळले; 49 जणांचा मृत्यू!

Russian Passenger Plane Crashed: रशियाच्या सुदूर पूर्वेकडील अमूर (Amur) प्रांतात एक जुने एएन-24 (AN-24) प्रवासी विमान कोसळले.

Manish Jadhav

Russian Passenger Plane Crashed: रशियाच्या सुदूर पूर्वेकडील अमूर (Amur) प्रांतात एक जुने एएन-24 (AN-24) प्रवासी विमान कोसळले असून, यात सुमारे 49 जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताप्रमाणेच या अपघातातही कोणताही प्रवासी किंवा कर्मचारी जिवंत वाचलेला नाही, अशी माहिती रशियन हवाई वाहतूक नियंत्रण विभागाने दिली.

अपघाताची सविस्तर माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, अंगारा एअरलाईनचे हे एएन-24 विमान चीनच्या (China) सीमेला लागून असलेल्या अमूर क्षेत्रातील टिंडा (Tynda) शहराकडे जात असताना रडार स्क्रीनवरुन गायब झाले. त्यावेळी विमान अमूर क्षेत्रावरुन उड्डाण करत होते. हवाई वाहतूक नियंत्रण विभागाचा विमानाशी संपर्क तुटल्यानंतर, काही वेळातच विमानाचा मलबा अमूर क्षेत्रात सापडला.

स्थानिक आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले की, प्रारंभिक माहितीनुसार विमानात 5 मुलांसह 43 प्रवासी आणि 6 कर्मचारी असे एकूण 49 जण होते. तर, आपत्कालीन मंत्रालयाने प्रवाशांची संख्या अंदाजे 40 च्या आसपास असल्याचे सांगितले आहे.

अपघाताचे संभाव्य कारण आणि रशियातील विमान प्रवास

प्राथमिक अंदाजानुसार, कमी दृश्यमानतेत (Low Visibility) लँडिंग करत असताना वैमानिकांच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियासारख्या विशाल देशातील सुदूर अंतर्गत भागात विशेषतः आर्कटिक आणि सुदूर पूर्वेकडील प्रदेशात जिथे हवामानाची स्थिती अनेकदा खराब असते, तिथे विमान प्रवास धोकादायक ठरु शकतो. अलीकडच्या वर्षांत रशियन विमान सुरक्षा मानकांमध्ये सुधारणा झाली असली तरी, दूरच्या भागातील जुन्या विमानांशी संबंधित अपघात अजूनही घडत आहेत.

एएन-24 विमानाचा घटनांचा इतिहास

अपघातग्रस्त झालेले एएन-24 विमान 63 वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येत आहे. सोव्हिएत संघाने 1967 मध्ये कमी अंतरावर उड्डाण करण्यासाठी या विमानांची निर्मिती केली होती. 1979 पर्यंत एएन-24 विमानांचे उत्पादन सुरु होते. एकूण 1367 एएन-24 विमाने बनवण्यात आली होती आणि ती अजूनही अनेक ठिकाणी वापरात आहेत.

2021 मध्ये अपघात

2021 मध्ये, रशियाच्या (Russia) सुदूर पूर्वेत एक जुने अँटोनोव्ह एएन-26 (Antonov AN-26) वाहतूक विमान कोसळले होते, ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्याच वर्षी जुलैमध्ये कामचटका (Kamchatka) येथे झालेल्या एका अपघातात एंटोनोव्ह एएन-26 ट्विन-इंजिन टर्बोप्रॉप विमानातील सर्व 28 लोक ठार झाले होते. रशियामध्ये अशा दुर्घटनांमध्ये नेहमीच जीवहानी होते असे नाही; तांत्रिक बिघाडांमुळे उड्डाणांचे मार्ग बदलणे किंवा आपत्कालीन लँडिंग करणे हे देखील सामान्य आहे. मात्र, हा अपघात पुन्हा एकदा जुन्या विमानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणत करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Startup Policy: गोमंतकीय तरुणांसाठी मोठी बातमी! सरकारचे स्टार्टअप धोरण जाहीर; 10 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

Kadamba Protest: EV बस 2 कोटीची, पगार मात्र 600 रुपये! कदंब चालक मागण्यांसाठी आक्रमक; संपाचा दिला इशारा

Rama Kankonkar: जेल की बेल? काणकोणकर हल्लाप्रकरणी 8 संशयित न्यायालयात होणार हजर; प्रकरणाची ठरणार दिशा

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

SCROLL FOR NEXT