Abdul Basit On Ishaq Dar Statement Dainik Gomantak
ग्लोबल

India-Pakistan Relations: ''भारतासोबत व्यापार...''; पाक परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्यावर पूर्व राजदूत अब्दुल बासित बरसले

Abdul Basit On Ishaq Dar Statement: पाकिस्तान सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातच आता, पुन्हा एकदा भारताबरोबर व्यापार सुरु करण्याची मागणी पाकिस्तानात जोर धरु लागली आहे.

Manish Jadhav

India-Pakistan Relations:

पाकिस्तान सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातच आता, पुन्हा एकदा भारताबरोबर व्यापार सुरु करण्याची मागणी पाकिस्तानात जोर धरु लागली आहे. पाकिस्तान सरकारमधील मंत्र्याने नुकतेच दोन्ही देशातील व्यापाराबाबत मोठे वक्तव्य केले होते.

दरम्यान, पाकिस्तानचे माजी अधिकारी अब्दुल बासित यांनी भारतासोबतच्या व्यापाराबाबत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दार यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. अत्यंत महत्त्वाच्या पदावर असताना दार यांनी जे काही वक्तव्य केले आहे, ती मोठी घोडचूक असल्याचे बासित यांनी म्हटले. अब्दुल बासित हे जर्मनीमध्ये पाकिस्तानचे राजदूत राहिले आहेत. त्याचबरोबर त्यांनी भारतात पाकिस्तानचे उच्चायुक्त म्हणूनही काम केले आहे. बासित म्हणाले की, ''परराष्ट्र मंत्री आपल्या मनात येईल ते बोलू शकत नाही. यासाठी औपचारिक धोरण आहे, पण दार यांनी कोणताही सल्ला न घेता हे वक्तव्य केले.''

अब्दुल बासित यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये लिहिले की, ''या मुद्द्यावर कोणत्याही स्वरुपाची कॅबिनेट बैठक झाली नाही. त्यांची टिप्पणी केवळ चुकीच्या वेळी आली नाही तर चुकीचा सल्लाही दिला गेला. ते जे बोलले ते त्यांच्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्याच्या विरोधात आहे. दार यांच्याकडून ही एक मोठी राजनैतिक चूक ठरली. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी हे वक्तव्य केले.''

इशाक दार यांनी भारतासोबत व्यापार सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दार यांनी अलीकडेच म्हटले होते की, ''त्यांचे सरकार भारतासोबतचे व्यापारी संबंध पूर्ववत करण्याचा विचार करेल.'' ब्रुसेल्समधील अणुऊर्जा शिखर परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मुहम्मद इशाक दार यांनी शनिवारी लंडनमध्ये सांगितले होते की, ''त्यांच्या देशाचा व्यापारी वर्ग भारतासोबत व्यापार पुन्हा सुरु करु इच्छितो.''

दुसरीकडे, पाकिस्तानी उद्योगपती भारतासोबत व्यापार पुन्हा सुरु करण्याच्या बाजूने असल्याचे परराष्ट्र मंत्री दार यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते. अशा परिस्थितीत आम्ही भारतासोबत व्यापारी संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याचा विचार करु आणि त्याकडे गांभीर्याने लक्ष्य देऊ, असेही दार म्हणाले. भारत सरकारने 2019 मध्ये काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर आणि राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT