Burn Dainik Gomantak
ग्लोबल

'या' पश्चिम आफ्रिकन देशात भीषण आग, 35 जणांचा होरपळून मृत्यू

बेनिनची राजधानी पोर्टो नोवो येथील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 35 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Manish Jadhav

बेनिनची राजधानी पोर्टो नोवो येथील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 35 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

मोठ्या संख्येने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आग एवढी भीषण होती की, बहुतांश लोकांना वाचवण्याची संधीच मिळाली नाही. आग लागल्यानंतर प्रचंड ज्वाळा आणि काळा धूर आकाशात उठताना दिसत आहे.

आग विझवण्यात आणि लोकांचे प्राण वाचवण्यात अग्निशमन दलाचे जवान आणि बचाव आणि मदत पथक व्यस्त होते.

दरम्यान, पोर्टो नोवो येथे ही घटना घडली. येथील कमर्शिअल इमारतीला आग लागली. आगीचे कारण समजू शकलेले नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत 35 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. घटनास्थळी मृतकांचा शोध सुरु आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी रविवारी एका निवेदनात सांगितले की, बेनिनच्या राज्य प्रसारकाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये आग विझल्यानंतर इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आणि इमारतीजवळ उभ्या असलेल्या अनेक कार आणि मोटारसायकलींचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पेट्रोल (Petrol) साठवण्यासाठी असलेल्या ठिकाणी हा अपघात (Accident) झाला. आग लागल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी तीन जणांचे प्राण वाचवण्यात यश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT