सूर्याने खगोलशास्त्रज्ञांना नेहमीच भुरळ घातली आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेने शास्त्रज्ञांना देखील आश्चर्यचकित केले आहे. सूर्याचा एक मोठा भाग त्याच्या पृष्ठभागापासून तुटला आहे आणि त्याच्या उत्तर ध्रुवाभोवती भोवऱ्यासारखे वावटळ निर्माण झाले आहे. ही घटना कशी घडली याचे विश्लेषण सध्या शास्त्रज्ञ करण्याचा प्रयत्न करत आहेत.
नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने ही दुर्मिळ घटना कॅप्चर केली आहे. गेल्या आठवड्यात अवकाश हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या तज्ज्ञ डॉ. तमिता स्कोव्ह यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. सूर्य सौर ज्वाला उत्सर्जित करतो त्याचा पृथ्वीच्या दळणवळणावर परिणाम होतो. यामुळे शास्त्रज्ञ चिंतेत आहेत.
नासाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, "सूर्याच्या पृष्ठभागापासून बाहेरील बाजूने पसरलेले एक मोठे वैशिष्ट्य आहे. अशी अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आली आहेत पण या घटनेमुळे वैज्ञानिक समुदायाला धक्काच बसला आहे."
"#SolarPolarVortex च्या अधिक निरीक्षणातून असे दिसून आले आहे की सुमारे 60 अंश अक्षांशावर ध्रुवावर प्रदक्षिणा घालण्यासाठी सुमारे 8 तास लागले. याचा अर्थ असा आहे की या घटनेत क्षैतिज वाऱ्याचा वेग समाविष्ट आहे. अंदाज कमाल मर्यादा 96 किलोमीटर प्रति सेकंद किंवा 60 मैल प्रति सेकंद.!" असे ट्विट डॉ. स्कॉव्ह यांनी केले आहे.
यूएस नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक रिसर्चचे सौर भौतिकशास्त्रज्ञ स्कॉट मॅकिंटॉश, जे अनेक दशकांपासून सूर्याचे निरीक्षण करत आहेत, त्यांनी Space.com ला सांगितले की असा "व्हर्टेक्स" कधीच पाहिला नाही.
घटनेबदद्ल अधिक माहिती गोळा करण्यासाठी आणि स्पष्ट चित्र सादर करण्यासाठी अवकाश शास्त्रज्ञ आता या विचित्र घटनेचे विश्लेषण करत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.