Pakistan Economic Crisis: गाढवांच्या भरोसे कंगाल पाकिस्तान, तर चीन डुकरांवर अवलंबून...!

Pakistan: जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करताना पाकिस्तान पराभूत झाला आहे.
 Shehbaz Sharif & Xi Jinping
Shehbaz Sharif & Xi JinpingDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Economic Crisis: जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करताना पाकिस्तान पराभूत झाला आहे. भारताचा प्रमुख शेजारी आणि कट्टर शत्रू पाकिस्तानने आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गाढवाची मदत घेतली आहे. या देशात गाढवांचे पालनपोषण करुन त्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जात होती.

दरम्यान, पाकिस्तानचा (Pakistan) कट्टर मित्र चीन त्याच्या गाढवांचा सर्वात मोठा खरेदीदार होता. गाढव हा पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांचे उत्पादन वाढल्यास देशाचा जीडीपी वाढेल, असे एका पाकिस्तानी मंत्र्याने म्हटले होते.

तसेच, गाढवाच्या मदतीने जीडीपी वाढवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानचे काय झाले ते सारे जग पाहत आहे. आता चीननेही (China) आपला मित्र पाकिस्तानचा मार्ग अनुसरण्यास सुरुवात केली आहे. चीन हा भारताचा शेजारी आणि कट्टर शत्रूही आहे.

या बाबतीत हा देश आपला मित्र पाकिस्तानपेक्षा अनेक पावले पुढे गेला आहे. आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चीनने आता डुकरांचा आधार घेतला आहे. यासाठी चीनने जगातील सर्वात मोठा 26 मजली पिग फार्मिंग टॉवर बांधला आहे.

 Shehbaz Sharif & Xi Jinping
Pakistan Economic Crisis: पाकिस्तानला पुन्हा मोठा धक्का, बेलआउट पॅकेजबाबत अंतिम निर्णय...!

चीन महाकाय टॉवर उभारणार

ड्रॅगनने नुकतेच मध्य चीनमधील यांग्त्झी नदीच्या दक्षिण किनार्‍यावर असलेल्या एझोउ शहराच्या बाहेरील भागात डुक्कर पालनासाठी 26 मजली गगनचुंबी इमारत बांधली आहे. चीनने याचे वर्णन जगातील सर्वात मोठे फ्री स्टॅडिंग पिग फॉर्म म्हणून केले आहे.

यामध्ये वर्षभरात 12 लाख डुकरांचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर डुक्कर पालनाचा उद्देश अन्न उत्पादन सुधारणे आणि कृषी उत्पादनांवर साखरेचे अवलंबित्व कमी करणे हा आहे.

 Shehbaz Sharif & Xi Jinping
Pakistan Economic Crisis: तोंड बोलतं अन्...! पाक PM च्या वक्तव्यानंतर पाकिस्तानी रुपयात मोठी घसरण

तसेच, चीनला डुक्कर पालनाद्वारे जगभरात कृषी स्पर्धात्मकता वाढवायची आहे. त्याचवेळी, त्याला त्याची आयात कमी करुन निर्यातदार बनायचे आहे. म्हणूनच चीनने राष्ट्रीय मोहीम म्हणून याची सुरुवात केली आहे. आता अशी गगनचुंबी डुक्कर पालनगृहे देशभर बांधली जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com