Mexico Bus Accident Reuters
ग्लोबल

Mexico Bus Accident: स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या बसला मेक्सिकोमध्ये अपघात, 17 ठार

अपघातात झाला त्यावेळी ऑन स्पॉट पंधरा जणांनी आपला जीव गमवला आहे.

Pramod Yadav

Mexico Bus Accident: मध्य मेक्सिकोमध्ये स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. यात 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बसमध्ये 45 प्रवाशांना घेऊन उत्तरेकडे जात असताना रविवारी दुपारी महामार्गावर हा अपघात झाला.

व्हेनेझुएला, कोलंबिया आणि मध्य अमेरिकेतील स्थलांतरितांना घेऊन जात होती. अशी माहिती पुएब्लाचे गृहमंत्री ज्युलिओ हुएर्टा यांनी पत्रकारांना दिली आहे.

"अपघातात झाला त्यावेळी ऑन स्पॉट पंधरा जणांनी आपला जीव गमवला आहे." असे हुएर्टा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दुखापतग्रस्त आणखी 15 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, इतर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. असे हुएर्टा म्हणाले.

टूर्स टुरिस्टिकॉस मेडिना नावाच्या खाजगी बस लाइनचा ही बस आहे, दक्षिण मेक्सिकोच्या सीमावर्ती शहर तपाचुला येथून मेक्सिको सिटीकडे जात असताना हा अपघात झाला. असे स्थानिकांनी सांगितले. मृतांमध्ये बसचा चालक आणि सहाय्यक यांचा समावेश आहे.

कोलंबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. मृतांमध्ये एका 56 वर्षीय कोलंबियन व्यक्तीचा समावेश आहे. तर, बचावलेल्यांमध्ये कोलंबियातील दोन पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे. जखमींना पुएब्ला येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात झाल्याचे मेक्सिकन माध्यमांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात, पनामामध्ये डझनभर स्थलांतरित लोक ज्या बसमध्ये प्रवास करत होते तीचा अपघात झाला. बस एका कड्यावरून खाली पडल्याने हा अपघात झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

'माझे पोलीस स्टेटमेंट माध्यमांमध्ये कसे लीक झाले'? रामा यांच्या पत्नीची पणजी पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार

Goa Politics: 'आप'च्या राजकारणाची स्क्रिप्ट उघड! "छुपे साटेलोटे नेत्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत", काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

Watch Video: "लड़कियों के हाथों में मजा बहुत है, वो...", पाकिस्तान महिला संघाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान Viral

Yashasvi Jaiswal: शुभमन गिलनंतर आता यशस्वी जैस्वालचाही 'कॅप्टन'पदावर डोळा; म्हणाला, "मला पण कर्णधार बनायचयं!"

SCROLL FOR NEXT