UPI-PayNow launched: भारत-सिंगापूरमध्ये डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठा करार, सर्वसामान्य नागरिकांना होणार फायदा

भारत आणि सिंगापूर यांच्यात डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात ऐतिहासिक करार झाला आहे.
UPI-PayNow launched
UPI-PayNow launchedDainik Gomantak
Published on
Updated on

UPI-PayNow launched: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली हिसन लुंग (Hsien Loong) यांनी आज डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात एतिहासिक करार झाला आहे.

भारताचा UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस आणि सिंगापूरचा PayNow यांना जोडून दोन्ही देशांदरम्यान क्रॉस-बॉर्डर पेमेंट कनेक्टिव्हिटी सुरू झाली. आज सकाळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका कार्यक्रमात भाग घेऊन त्याची सुरुवात केली आहे.

भारतातून आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास आणि सिंगापूरच्या नाणे प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक रवी मेनन यांनी ही सुविधा सुरू केली आहे. भारत (India) आणि सिंगापूर दरम्यान रिअल-टाइम पेमेंट सिस्टम लिंकेज सुरू करण्यात आले आहे.

याद्वारे भारत आणि सिंगापूर यांच्यातील सीमापार कनेक्टिव्हिटी अंतर्गत खूप सहज आणि त्वरीत पैसे ट्रासंफर केले जाऊ शकतात. 

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) या कार्यक्रमा दरम्यान म्हणाले की, हा प्रसंग दोन्ही देशांसाठी खूप अभिनंदनाचा प्रसंग आहे. मी भारत आणि सिंगापूरच्या जनतेचे अभिनंदन करतो की या करारामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील. 

सिंगापूरमध्ये राहणारे भारतीय ज्या सहजतेने UPI द्वारे भारतात पैसे ट्रासंफर  करू शकतील, ही डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन्ही देशांचे नागरिक त्यांच्या मोबाईलवर (Mobile) एकमेकांच्या देशातील लोकांना पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतील. याचा विशेष फायदा विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com