Maldives President Muhammad Muizzu Dainik Gomantak
ग्लोबल

मालदीवच्या अध्यक्षांचा आडमुठेपणा; भारतीय विमान वापराला परवानगी नाकारल्याने 14 वर्षीय मुलाने गमावाला जीव

India-Maldives: मुलाला ब्रेन ट्यूमर होता आणि त्याला पक्षाघाताचा झटका आल्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक बनली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला राजधानी माले येथे नेण्यासाठी एअर एम्ब्युलन्सची विनंती केली होती.

Ashutosh Masgaunde

A 14-year-old boy lost his life after being denied permission to use Indian aircraft by Maldivian President Mohammed Muizzoo:

मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध खूपच बिघडले आहेत. मालदीवच्या मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यावर ही कटुता समोर आली आहे. तेव्हापासून तणावात सातत्याने वाढ होत आहे.

आता मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्या चुकीच्या निर्णयाने 14 वर्षांच्या निष्पाप मुलाचा जीव घेतला. वास्तविक, मुलाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी भारतीय डॉर्नियर विमानाची गरज होती, ज्यासाठी मालदीव सरकारने परवानगी दिली नाही. उपचारास उशीर झाल्याने शनिवारी मुलाने जीव गमवावा लागला.

भारताने यापूर्वी दोन नौदल हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान मालदीवला वैद्यकीय निर्वासनासाठी आणि आणीबाणी परिस्थितीशी लढण्यासाठी दिले आहे. मात्र, मालदीव सरकारने भारतीय सैन्य परत पाठवण्याचा आग्रह धरल्याने भारतीय हेलिकॉप्टर आणि विमानांचे भवितव्य अधांतरी आहे.

अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला १५ मार्चपर्यंत आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले आहे. मात्र, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अजूनही चर्चा सुरू असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या बुधवारी घडली. मुलाला ब्रेन ट्यूमर होता आणि त्याला पक्षाघाताचा झटका आल्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला गाफ अलिफ विलिंगिली येथील त्याच्या घरातून राजधानी माले येथे नेण्यासाठी एअर एम्ब्युलन्सची विनंती केली. तात्काळ वैद्यकीय स्थलांतर करण्यात अधिकारी अपयशी ठरल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

रिपोर्टनुसार, मृत मुलाच्या वडिलांनी सांगितले की, 'मी मुलाला झटका आल्यानंतर लगेचच त्याला माले येथे नेण्यासाठी आयलँड एव्हिएशनला कॉल केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. गुरुवारी सकाळी 8.30 वाजता त्यांनी फोनला उत्तर दिले. या प्रकारासाठी एअर एम्ब्युलन्स हा एकमेव उपाय आहे. आणीबाणीच्या एअरलिफ्टची विनंती केल्यानंतर 16 तासांनी मुलाला मालेकडे आणण्यात आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

मुलाच्या मृत्यूबद्दल लोकांनी रुग्णालयाबाहेर निदर्शने करून संताप व्यक्त केला. तथापि, वैद्यकीय स्थलांतराची जबाबदारी असलेल्या आसंधा लिमिटेड या कंपनीने निवेदन जारी केले की, विनंतीची माहिती मिळताच त्यांनी निर्वासन प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, शेवटच्या क्षणी काही तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे विलंब झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shefali Jariwala: तू नेहमी माझ्या हृदयात... शेफालीच्या मृत्यूनंतर पती दुःखातून सावरेना, बघा काय केलं? Watch Video

Nachinola House Fire: नास्नोळा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, 5 लाखांचे नुकसान

'माझे घर' योजनेचा लाभ घ्या; मुख्यमंत्री सावंतांचे गोमंतकीयांना आवाहन, 1972 पूर्वीची घरे नियमित होणार

Amba Ghat Landslide: कोकणात मुसळधार पावसाचा तडाखा, आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

America Accident: अमेरिकेत भीषण अपघात! यू-टर्न घेणाऱ्या ट्रकला धडकली कार, तिघांचा जागीच मृत्यू; भारतीय चालकावर हत्त्येचा आरोप VIDEO

SCROLL FOR NEXT