Nepal Flood Dainik Gomantak
ग्लोबल

Nepal Flood: चिखलाचा लोंढा, घरांचा ढिगारा अन् मृत्यू समोर; 97 वर्षीय गुणा माया बोहरांनी हार मानली नाही, चार तासांनी सुखरूप बाहेर

97 Year Old Guna Maya Bohra Rescued: डोळ्यांसमोर घर वाहून जात होते... जीव वाचविण्यासाठी सगळे जण सैरावैरा धावत होते...कुणी डोंगर चढत होते, कुणी जंगलाचा आसरा घेत होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

काठमांडू: डोळ्यांसमोर घर वाहून जात होते... जीव वाचविण्यासाठी सगळे जण सैरावैरा धावत होते...कुणी डोंगर चढत होते, कुणी जंगलाचा आसरा घेत होते. पाण्याचा रौद्र प्रवाह आणि चिखलाच्या लोंढ्याने सारे काही गिळंकृत केले.

मात्र, अशा परिस्थितीत मृत्यू समोर असतानाही नेपाळमधील अनेकांनी हार मानली नाही. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती माणसाला किती ताकद देते, याची साक्ष देणाऱ्या या कहाण्या आता समोर येऊ लागल्या आहेत. या संकटातून वाचलेल्या ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची कहाणी त्याचेच प्रातिनिधिक रूप! जगण्याची हीच उमेद या आजींसह अनेकांच्या आयुष्याला बळ देणारी ठरली आहे.

चिखलाने माखलेले शरीर, थकलेला चेहरा आणि त्यातून बाहेर येण्याची आस....९७ वर्षीय गुणा माया बोहरा यांचा बचाव करतानाचा हा क्षण नेपाळमधील महापुराचे प्रतीक ठरला आहे. जगण्याचे नवे अंकुर फुलविणारा हा क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर गेला आहे. तब्बल चार तास ढिगाऱ्याखाली अडकून राहिल्यानंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

‘पाण्याने मला डोंगराकडे फेकले’

दोलखा येथील तुळशी बहादूर भंडारी यांनीही मृत्यू जवळून पाहिला. चिखल आणि पाण्याच्या लोंढ्याने डोळ्यांसमोर घरे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळत होती. या प्रवाहाने भंडारी यांनाही ओढून नेले. मात्र, प्रवाहाने त्यांना डोंगराच्या बाजूला फेकले आणि जीव वाचला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT