School Girls in Afganistan Dainik Gomantak
ग्लोबल

School Girls in Afganistan: तालिबानच्या राज्यात क्रुरता थांबेना! 80 विद्यार्थिनींना पाजले विष

Ashutosh Masgaunde

Poison Attack on Afghanistan Girls: इस्लामिक देश इराणनंतर आता अफगाणिस्तानमध्येही विद्यार्थीनींनाही विष पाजल्याची घटना समोर आली आहे. येथे, उत्तर भागातील दोन वेगवेगळ्या शाळांमध्ये प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या सुमारे 80 मुलींना विष पाजून मारण्याचा प्रयत्न झाला.

मुलींना विषाचा त्रास होऊ लागला आणि अनेकांची अवस्था बिकट झाली. या भागातील शिक्षणाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

अफगाणिस्तानात तालिबान राजवट आहे आणि ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर मुलींना विष पाजून मारण्याची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी 2015 मध्ये अफगाणिस्तानमध्येही मुलींना विष पाजून मारण्याचा प्रयत्न झाला होता.

तालिबान राजवटीत 'अर्ध्या लोकसंख्येचे' भवितव्य धोक्यात

आश्‍चर्यकारक बाब म्हणजे अफगाण मुलींना विष पाजणारे लोक सापडले नाहीत, दोन्ही घटनांची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नाही.

मात्र, अनेक मानवाधिकार संघटना या घटनांमध्ये तालिबानचा हात असल्याचे सांगत आहेत, कारण तालिबानचा महिलांबाबतचा दृष्टिकोन अतिशय कडक राहिला आहे.

अफगाणिस्तानात सत्तेवर आल्यानंतर तालिबानने असे निर्णय घेतले आहेत की, त्यांना रोखणे संयुक्त राष्ट्रालाही शक्य नाही. देशातील अनेक भागात तालिबानने युएन मिशनमध्ये काम करणाऱ्या महिलांवरही निर्बंध लादले आहेत.

सहावीच्या पुढे शिक्षणावर बंदी

अफगाणिस्तानमधील तालिबानने याआधीच मुलींना 6 वीच्या पुढे शिक्षण घेण्यावर बंदी घातली आहे. आता ज्या शाळांमध्ये मुलींना विषबाधा झाली आहे त्या अफगाणिस्तानच्या सार-ए-पुल प्रांतात आहेत.

दोन्ही शाळा एकमेकांच्या आजूबाजूला असल्याचे सांगितले जात आहे. विषबाधा झालेल्या मुलींचे वय काय आणि त्या कोणत्या वर्गात शिकतात हे अद्याप समजू शकलेले नाही.

या वर्षाच्या सुरुवातीला इराणमध्ये हजारो मुलींवर विषारी हल्ला झाला होता, ज्यामध्ये अनेक मुलींना आपला जीव गमवावा लागला होता.

महिलांववर अनेक बंधने

इराणप्रमाणेच, अफगाणिस्तान देखील एक घोषित इस्लामिक राष्ट्र आहे आणि तेथे 95% पेक्षा जास्त मुस्लिम लोक आहेत. दोन्ही देशांनी हिजाब आणि बुरखा अनिवार्य केला आहे.

याशिवाय महिलांना कामाच्या ठिकाणी जाण्याची परवानगी नाही आणि महिला कामावर गेल्या तरी डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर झाकून ठेवावे लागते.

मात्र, मानवाधिकार संघटना अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला विषबाधेच्या घटनेवरून शिव्याशाप देत आहेत, इस्लामी देशात काय चालले आहे, महिला अशाच प्रकारे कट्टरतावाद्यांचे लक्ष्य राहतील का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT