Islamabad High Court Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: पाकिस्तानात न्यायाधीशांच्याही जीवाला धोका, 8 जणांना धमक्या; मुख्य न्यायाधीशांचे ISI वर गंभीर आरोप

8 High Court Judges In Pakistan Received Threats: दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनलेल्या पाकिस्तानात आता सामान्य लोकांबरोबर न्यायाधीशही सुरक्षित नाहीत. न्यायाधीशांच्या जीवालाही आता धोका निर्माण झाला आहे.

Manish Jadhav

8 High Court Judges In Pakistan Received Threats: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लोक दोन वेळच्या अन्नासाठी झगडत आहेत. तर दुसरीकडे, मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा दहशवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनलेल्या पाकिस्तानात आता सामान्य लोकांबरोबर न्यायाधीशही सुरक्षित नाहीत. न्यायाधीशांच्या जीवालाही आता धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आमिर फारुक यांच्यासह आठ न्यायाधीशांना धमकीची पत्रे आली आहेत. या पत्रांमध्ये काही संशयास्पद साहित्यही होते. याआधीही पाकिस्तानच्या बलाढ्य गुप्तचर संस्थेवर (ISI) न्यायालयीन प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर न्यायाधीशांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. यापूर्वी, इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश काझी फैस इसा यांना एक पत्र लिहिले होते, ज्यात त्यांनी देशाच्या गुप्तचर संस्थांकडून न्यायालयीन प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल तक्रार केली होती.

पत्र मिळाल्याची पुष्टी करताना फारुख यांनी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सांगितले की, या घटनेमुळे दिवसाची सुनावणी लांबली. एक्स्प्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राने न्यायालयीन सूत्रांच्या हवाल्याने म्हटले की, दोन न्यायाधीशांना मिळालेल्या पत्रांची पाकिटे उघडल्यानंतर त्यांना आत पावडर मिळाली.

दुसरीकडे, इस्लामाबाद पोलिसांचे तज्ज्ञांचे पथक संशयास्पद पावडरचा तपास करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही पत्रे एका महिलेने लिहिली आहेत. न्यायालयीन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तातडीने उलघडा करण्यासाठी पोलिसांना पाचारण केले. तसेच, पुढील तपासासाठी ही पत्रे दहशतवाद विरोधी विभागाकडे सोपवण्यात आली आहेत. मुख्य न्यायाधीश इसा यांनी गुप्तचर संस्थांच्या हस्तक्षेपाबाबत IHC न्यायाधीशांच्या पत्रावर स्वतःहून कारवाई करण्याची घोषणा केल्याच्या एक दिवसानंतर ही घटना घडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Song Viral: ''मणगणे खातो मणगणे'' कनमाणी गाण्याचं कोकणी व्हर्जन व्हायरल; पहा Video

Online Food Ordering Platforms: Zomato, Swiggy वरून जेवण ऑर्डर करणं महाग, कोणतं प्लॅटफॉर्म देतंय स्वस्त डिलिव्हरी सेवा? जाणून घ्या

Zimbabwe vs Sri Lanka: सिकंदर रजाचा 'डबल धमाका'! श्रीलंकेला पराभवाची धूळ चारत केली मोठी कामगिरी; SKY आणि सेहवागला सोडले मागे

Viral Video: मेट्रोतील 'इन्स्टा' वेड! 'बॅटमॅन' बनून रिल करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'एवढी ताकद अभ्यासात लावली असती तर...'

Japan PM Resign: जपानमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची राजीनाम्याची घोषणा, कारण काय?

SCROLL FOR NEXT