Iran-Pakistan Gas pipeline : पाकिस्तान-इराण गॅस पाइपलाइन प्रकल्पाला अमेरिका विरोध का करतेय?

Pakistan: याआधीदेखील अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिला आहे.
Iran- Pakistan-USA
Iran- Pakistan-USADainik Gomantak

US opposes Pakistan- Iran gas pipeline project

इराण आणि पाकिस्तानमधील गॅसलाइन प्रकल्प हा चर्चेचा विषय ठरत आहे. आता अमेरिकेने या प्रकल्पाला विरोध करत पाकिस्तानला हा प्रकल्प बंद करण्याचा इशारा दिला आहे. मंगळवारी अमेरिकेने आपण पाकिस्तान आणि इराण गॅसलाइन प्रकल्पाच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

'द न्यूज' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्याने पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही प्रत्येक देशाला नेहमीच सल्ला देतो की इराणशी व्यापार करताना अमेरिकेने घातलेले निर्बंध तोडण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रत्येक देशाने याचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.

आठवडाभरात दुसऱ्यांदा अमेरिकेने इराण-पाकिस्तान गॅस पाइपलाइनवर आक्षेप व्यक्त करणारे वक्तव्य केले आहे. अलीकडेच, दक्षिण आणि मध्य आशियासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे उच्च अधिकारी डोनाल्ड लू यांनी काँग्रेसच्या पॅनेलसमोर स्पष्टपणे सांगितले की ही पाइपलाइन थांबविली पाहिजे. याआधीदेखील अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिला आहे.

अमेरिका- इराण संबंध

अमेरिका आणि इराण या दोन देशांत १९७९-८० पासून सतत वादविवाद, एकमेकांविरोधी भूमिका यामुळे संबंध अतिशय वाईट असल्याचे पाहायला मिळतात. इराण सतत मानवी हक्कांचे उल्लंघण करतो, इराणचे आण्विक कार्यक्रम आणि पाश्चिमात्य देशांविरुद्ध विचारसरणीचा अमेरिकेने सातत्याने विरोध केला आहे. इराणवर अनेक निर्बंधदेखील लादले आहेत. याचा परिणाम इतर देश इराण बरोबर कोणताही करार करत असतील त्यावर होतो. इराण- पाकिस्तानच्या एकमेंकाविरोधी असलेल्या भूमिकांमुळे इतर देशांची कोंडी निर्माण होते. कारण इराण बरोबर कोणताही करार किंवा प्रकल्प केला तर त्या देशाचे अमेरिकेबरोबरच्या संबंधात वितुष्ठ निर्माण होते.

दुसरीकडे, पाकिस्तान मोठ्या प्रमाणात आर्थिक गोष्टींसाठी अमेरिकेवर अवलंबून आहे. त्यामुळे अमेरिका पाकिस्तान- इराण गॅस पाइपलाइन प्रकल्पाला अमेरिका विरोध करत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने या पाइपलाइसंबंधी अमेरिकेच्या निर्बंधातातून सूट मिळावी असे म्हटले होते. आता हा प्रकल्प पाकिस्तान पुढे नेणार का? शहाबाज शरीफ यांचे सरकार काय करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच, इराण-पाकिस्तान गॅस पाइपलाइन प्रोजेक्ट जर पुढे सुरु ठेवला तर अमेरिका काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com