Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: बलुचिस्तानमध्ये पुन्हा 7 पंजाबींची हत्या; पाकिस्तानच्या तीन प्रांतात फुटीरतावादाची आग का धगधगतेय?

Pakistan Crime: गेल्या महिन्यातच बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील 11 जणांची हत्या करण्यात आली होती.

Manish Jadhav

Pakistan Crime: पाकिस्तानमधील प्रादेशिक संघर्ष शिगेला पोहोचताना दिसत आहे. गेल्या महिन्यातच बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील 11 जणांची हत्या करण्यात आली होती. यापैकी 9 जण पंजाबी होते. आता अशीच आणखी एक घटना बलुचिस्तानमधील ग्वादरमध्ये समोर आली आहे.

ग्वादरमध्ये गुरुवारी सकाळी सात जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हे सर्व लोक मजूर असून आपापल्या रुममध्ये झोपले होते. डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, ही घटना ग्वादरच्या सुरबंदरमध्ये घडली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसून, हा प्रादेशिक आधारावर झालेला हिंसाचार असल्याचेही मानले जात आहे.

दरम्यान, बलुचिस्तानचे (Balochistan) मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती यांनी या घटनेला उघड दहशतवाद असल्याचे म्हटले असून असे करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. बुगती म्हणाले की, मृतांच्या कुटुंबीयांना संपूर्ण मदत केली जाईल. आम्ही दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही. एवढेच नाही तर दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व करु, असेही बुगती म्हणाले. पाकिस्तानी रक्त सांडणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असेही ते पुढे म्हणाले.

दुसरीकडे, बलुच फुटीरतावादी संघटनांनी ही घटना घडवून आणल्याचे मानले जात आहे. याआधीही ग्वादरसह बलुचिस्तानच्या अनेक भागात हल्ले झाले असून त्यात पंजाबमधील लोकांना आणि अगदी चिनी लोकांना लक्ष्य करण्यात आले आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने अनेकदा या हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे. ही संघटना बलुचिस्तानला स्वायत्तता देण्याची मागणी करते. एवढेच नाही तर येथील चिनी प्रकल्पांनाही ही संघटना विरोध करते. पाकिस्तानच्या (Pakistan) स्थापनेपासून बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तुनख्वा या प्रांतांमध्ये फुटीरतावादी चळवळी सुरु आहेत.

पाकिस्तानचे तीन प्रांत का जळत आहेत, फुटीरतावाद कसा वाढला

या प्रांतांतील एका मोठ्या वर्गाचा असा विश्वास आहे की, पाकिस्तानने त्यांची संस्कृती, भाषा आणि हितसंबंधांकडे दुर्लक्ष केले. पश्तून स्वतःला एक वेगळा समुदाय आणि वेगळा देश मानतात. एवढेच नाही तर खैबर पख्तुनख्वामधील लोकांचा अफगाणिस्तानातील लोकांशीही संबंध आहेत. दोघेही स्वतःला सामान्य पश्तून संस्कृतीचे समजतात. त्याचप्रमाणे बलुचिस्तान आणि सिंधमधील लोकांचाही असा विश्वास आहे की, त्यांच्यावर पंजाबी वर्चस्व लादले गेले. पाकिस्तानच्या लष्कर, न्यायव्यवस्था आणि नोकरशाहीमध्ये पंजाबींच्या वर्चस्वाबद्दल या राज्यांमध्ये असंतोष आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT