Pakistan Army vs Police: ''भारतातही अशा घटना घडतात, पण...'' लष्कर आणि पोलिस यांच्यातील संघर्षामध्ये पाकिस्तानने असे का म्हटले?

Pakistan Army And Police Clash: मागील दोन दिवसांपासून पाकिस्तानात एकाच घटनेचे सर्वाधिक चर्चा सुरु आहे. पाकिस्तानी लष्कर आणि पोलिस अधिकारी आमनेसामने आले आहेत.
Pakistan Army
Pakistan ArmyDainik Gomantak

Pakistan Army And Police Clash:

पाकिस्तान सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. लोक दोन वेळच्या अन्नासाठी झगडत आहेत. यातच दहशतवादी घटनाही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. दहशतवादी सातत्याने हल्ले करत आहेत. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून पाकिस्तानात एकाच घटनेची सर्वाधिक चर्चा सुरु आहे. पाकिस्तानी लष्कर आणि पोलिस अधिकारी आमनेसामने आले आहेत. पोलिस ठाण्यात घुसून पोलिस अधिकाऱ्यांना विवस्त्र करुन मारहाण आणि अपमान केल्याचा आरोप पाकिस्तानी लष्करावर (Pakistan Army) करण्यात आला आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लाहोरपासून 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या बहावलनगरमधील डिव्हिजन ए पोलिस ठाण्यात ही घटना घडली असल्याचे सांगितले जाते.

दुसरीकडे मात्र, आपले उच्चपदस्थ अधिकारी आणि गृहमंत्री एवढा गंभीर विषय हलक्यात घेत असल्याने पोलिस अधिकारी चांगलेच संतापले आहेत. या घटनेला किरकोळ संबोधून ते टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी भारतालाही ओढले. ते म्हणाले की, अशा घटना भारतातही घडतात, परंतु अशा प्रकारच्या घटनांची आपल्याच देशात सर्वाधिक चर्चा होते.

Pakistan Army
Pakistan Heavy Rain: बुडत्याचा पाय खोलात! पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे 39 जणांचा मृत्यू; बलुचिस्तानमध्ये आणीबाणी लागू

दरम्यान, पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांना विवस्त्र करुन मारहाण केल्याच्या घटनेला एक आठवडा झाला आहे, परंतु हा मुद्दा अजूनही पाकिस्तानी मीडिया आणि सोशल मीडियावर चर्चेत आहे. मारहाणीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये पोलिस अधिकारी जीव वाचवण्यासाठी पळून जाताना दिसत आहेत.

भारतातही असे होते पण...

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, या मुद्द्यावर पाकिस्तानी जनता आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये संताप वाढला आहे. सरकार हे प्रकरण हलक्यात घेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी नुकतेच एक वक्तव्य करुन भारताला (India) या प्रकरणात खेचण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, 'अशा घटना भारतातही घडतात, परंतु पाकिस्तानात अशा घटनांची सर्वाधिक चर्चा होते.' या घटनेमुळे पोलिसांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होत आहे का, असा सवाल त्यांना विचारला असता त्यांनी उत्तर दिले की, ''अशा छोट्याशा घटनेने पोलिसांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होत नाही. आमचे पोलिस कर्मचारी पूर्ण क्षमतेने आणि धैर्याने कर्तव्य बजावत आहेत.''

Pakistan Army
Pakistan Court: पाकिस्तान कोर्टाचा धक्कादायक निर्णय, आरोपीला दिली 80 फटके मारण्याची शिक्षा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

एवढेच नाही तर पोलिसांचे आयजी दर्जाचे अधिकारीही या घटनेला अधिक महत्त्व दिल्याचे सांगत आहेत. ते पुढे म्हणाले की, ''ही घटना तितकी मोठी नाही, जितकी अतिशयोक्ती केली जात आहे. मात्र, पोलिस अधिकारी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची चर्चा आहे. या घटनेच्या दोन दिवसांनंतर पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाने 'पारदर्शक आणि संयुक्त तपासा'बाबत भाष्य केले आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर सर्व काही तुमच्या समोर येईल. असामाजिक तत्वांनी लष्कराच्या वेशात हे कृत्य केले का, याचाही शोध घेतला जाईल.''

Pakistan Army
Iran-Pakistan Tensions: इराण आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने; सुन्नी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 11 जण ठार

पोलीस ड्युटीवर जाण्यास टाळाटाळ करतायेत

पाकिस्तानमध्ये (Pakistan) लष्कर आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या संघर्षाने देशात इतके भयानक रुप धारण केले आहे की, लष्कराच्या दहशतीतून पोलिस अजूनही सावरलेले नाहीत. सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये असे दिसून येते की, लष्कराचे जवान गणवेशातील पोलिसांना गुडघ्यावर बसवून मारहाण करत आहेत. तर दुसरीकडे रक्ताने भिजलेले पोलिस अधिकारी लष्कराच्या जवानांकडे आपल्या जीवाची भीक मागत होते. या घटनेनंतर पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'त्यांचे मनोधैर्य खचत आहे. अशा घटनांमुळे पोलिस कर्मचारी ड्युटीवर जाण्यास टाळाटाळ करत आहेत. लोकांमध्ये पोलिसांबद्दलची भीती आणि आदर संपल्याचे त्यांना वाटते. अशा स्थितीत पोलिसांवर विश्वास कोण ठेवणार?'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com