Attack On Pakistani Army Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानने पोसलेले दहशवादी त्यांच्यावरच उलटले, लष्करावरील हल्ल्यात 5 जवान ठार

Attack On Pak Army: घटनेनंतर जोरदार गोळीबार सुरू झाला. मात्र, सुरक्षा जवानांनीही गोळीबाराला तत्काळ प्रत्युत्तर दिल्याचे लष्कराचे म्हणणे आहे.

Ashutosh Masgaunde

6 soldiers of Pakistan Army have been killed in a shootout with terrorists in Balochistan province:

दहशतवाद्यांना सातत्याने पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला दहशतवाद्यांनीच मोठा झटका दिला आहे. दक्षिण-पश्चिम पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांशी झालेल्या गोळीबारात पाकिस्तानी लष्कराचे 6 जवान ठार झाले आहेत. ISPR ने या घटनेची माहिती दिली आहे.

वास्तविक, लष्कराच्या कारवाईदरम्यान त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर छुप्या पद्धतीने हल्ला केला. या घटनेनंतर पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनीही प्रत्युत्तर दिले.

लष्कराच्या प्रत्युत्तरात एकूण तीन दहशतवादी ठार झाले आहेत. या संपूर्ण कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे 6 जवानही मारले गेले आहेत.

पाकिस्तानची मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने सांगितले की, केच जिल्ह्यातील बुलेदा भागात सुरक्षा दलांकडून कारवाई केली जात होती. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनाचा स्फोट घडवून आणला.

या घटनेनंतर जोरदार गोळीबार सुरू झाला. मात्र, सुरक्षा जवानांनीही गोळीबाराला तत्काळ प्रत्युत्तर दिल्याचे लष्कराचे म्हणणे आहे.

सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांवर प्रभावीपणे हल्ला केला. तीन दहशतवादी मारले गेल्याचे लष्कराने सांगितले. मात्र, या संपूर्ण कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे 6 जवानही मारले गेले आहेत. लष्कराचे म्हणणे आहे की, परिसरात सर्व प्रकारच्या दहशतवादी घटनांचा नायनाट करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.

दहशतवादी सातत्याने लष्कराच्या जवानांवर असे हल्ले करत आहेत. याआधी भारतीय लष्कराच्या जवानांवरही दहशतवादी हल्ला झाला होता. काही दिवसांपूर्वीच भारतातील पुंछ जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्याजवळ दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केले होते.

दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. मात्र, या घटनेत भारतीय लष्कराचे सर्व जवान सुखरूप बचावले. या घटनेनंतर भारतीय लष्कराकडून परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी हवाई शोधमोहीम आणि श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Milk Import: गोव्याची दूधाची तहान भागेना! रोज 2.60 लाख लिटर दुधाची आयात; 'कामधेनू' योजनेत सुधारणा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Goa Labour Report: गोव्यात रोजंदारीवरील कामगारांच्या संख्येत मोठी घट! 10 वर्षांत 40 हजार कामगार कमी झाले; कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नोंदीतून उघड

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

SCROLL FOR NEXT